करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याचा सर्वांगिण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मी कार्यरत असुन, करमाळयाची११८ गावे आणि माढ्यातील३६ गावांना गाव भेट दोऱ्याच्या निमित्ताने प्रत्येक नागरिकांपर्यंत भेटण्याचा आणि त्यांचे वैयक्तीक तसेच सार्वजनिक अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मी हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेहण्यापर्यंत स्वस्थ न बसणे हा माझा स्थायी स्वभाव असुन, माझ्या मतदार संघातील मार्गी लागलेली विकासकामे पाहुन मला समाधान मिळते. वस्तुतः माझ्यावर कोण काही खालच्या पातळीवर जाऊन वारंवार टिका टिप्पणी जरी करीत असले तरी त्या गोष्टींकडे मी नेहमीच दुर्लक्ष केलेले आहे. आणि मी माझे कार्यकर्त्याना देखिल तशा सुचना वेळोवेळी देत असतो. कोणावर टिका टिपणी करून विकास होत नसतो, जनता हुशार आहे.. कोण काय कसे काम करतोय याचे परिक्षण करण्याचे काम जनता जनार्दनांचे आहे. मी करमाळा- माढा विधानसभा क्षेत्राचा नकाशा डोळ्यासमोर ठेऊन विज,रस्ते, पाणी, जनतेचे आरोग्य या सर्व मुलभुत बाबींचा बारिक सारिक अभ्यास करून एक एक करून महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात यशस्वी झालेलो आहे. राजकारणात पक्षनिष्ठा,नेतृत्व निष्ठा,मैत्री याही गोष्टी सांभाळाव्या लागतात, ते कायम निभावुन ज्येष्ठांचा मान सन्मान राखुन मी कार्यरत आहे. मला भविष्यकाळात करमाळ्याचा , माढ्याचा चेहरामोहरा बदलेला पहायचा आहे. यासाठी मी प्रयत्नशील आहे. मी माझे विकासाचे व्हीजन घेऊन निघालेलो असुन यात कोणताही खंड पडणार नाही.. कोणी कितीही टिका टिप्पणी केली तरी त्यांचे विचार त्यांचेबरोबर.. वस्तुतः करमाळा तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणुक मला आमदार या नात्याने करायची आहे. आज गावागावात गेल्यावर तिथला प्रत्येक माणुस, तिथले युवक मंडळी, शेतकरी, व्यापारी, नोकरदार सर्वचजण भेटुन गावातल्या आणि परिसरातल्या समस्यांवर चर्चा करतात, काही समस्यांचे निराकरण मी तत्परतेने लगेच करून देत असुन.. आपण सर्वसामान्यांसाठी मागील काळात..”आमदार आपल्या दारी” हा उपक्रम राबविला आणि आज ” गावभेट दौऱ्यात- आमदार आपल्या गावी- विकासावर चर्चा व्हावी” हा उपक्रम राबविला असुन.. करमाळ्यातील दौर्यानंतर ३६ गावचा दौरा चालु केला आहे. मी माझ्या मतदार संघात वेगवेगळ्या माध्यमांतुन कोट्यावधीचा निधी प्राप्त करू शकलो हे माझे भाग्य असुन,*डिकसळ- कोंढार- चिंचोली पुलाचा प्रश्न मार्गी लागल्याचे समाधान आहे* नविन पुलाचे कामाची निविदा प्रक्रीया निघाली असुन, हे कामही लवकरच चालु होईल. या ठिकाणी असणाऱ्या जुन्या ब्रिटीशकालीन पुलाचे डागडुजी करीता देखिल या पुर्वीच मागणी केलेली असुन, या ठिकाणी डागडुगीचे कामही होणार आहे. मला सर्वसामान्य नागरिक त्यांचे रेशनकार्डचे प्रश्नापासुन ते छोटे मोठे अनेक प्रश्न सांगत असुन, त्याचे निराकरण मी तातडीने करून देत आहे. *जातेगाव- टेंभुर्णी मार्गाचे कामही लवकरच चालु होणार आहे. दोन वर्षाचा कोव्हीड चा कालावधी जाऊनही आज आपण विविध विकासकामे करण्यात यशस्वी झालो आहोत.*महाराष्ट्र राज्य शासनाची जलजीवन मिशन ची योजना संपूर्ण मतदारसंघात राबवायची असुन यासाठी भरीव निधी मिळवुन देणे ही माझी जवाबदारी आहे*.. अनेक गावातुन लाखो, कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असुन ही योजना यशस्वी होइल याची खात्री आहे.*जनतेच्या मागणी प्रमाणे मी करमाळा शहरासह जवळ जवळ प्रत्येक गावात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असलेपासुन निधी उपलब्ध करून दिला असुन, हा विकासाचा वेग वाढतच राहणार आहे* आपल्या कोणत्याही समस्या, मागण्या आणि अडीअडचणी बाबत तुम्ही प्रत्यक्ष अथवा माझे कार्यालयाशी संपर्क करावा.. असे मी सर्वांना आवाहन करीत असल्याचे आमदार महोदयांनी सांगितले. तसेच कोणावरही टिका टिप्पणी करताना प्रत्येकानेच आपल्या पात्रता देखिल बघितल्या पाहीजेत असे सांगितले. माझ्या गावभेट दौर्यामुळे कोणी हैराण, बैचेन होत असतील आणि कोनाचे पोटात पोटशुळ निर्माण होत असतील आणि विकासाचे कामात कोणी अडथळे निर्माण करीत असेल तर त्यावरही मात करायची क्षमता बाळगुनच मी विकासाला प्राधान्य देत असुन माझ्या विकासरथात ज्यांना यायचे आहे ते सामिल होऊ शकतात. अशी स्पष्ट भुमिका आमदार. संजयमामा शिंदे यांनी मांडली आहे.
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…