करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरालगत असलेल्या श्री विठ्ठल शुगर रिफाइंड फॅक्टरीचे ( कमलाभवानी शुगर )प्रदुषणामुळे नागरीकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे तरी तातडीने प्रदूषण बंद व्हावे अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे लेखी निवेदनाव्दारे केली आहे . निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि,करमाळा शहरालगत श्री .विठ्ठल रिफाइंड शुगर प्रा .लि .पांडे हा साखर कारखाना असून सदर साखर कारखान्याने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यान्वित केलेली नसल्याने या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर राख व काजळी बाहेर पडून आसपासच्या परिसरात सर्वत्र पसरत आहे . सदर कारखाना शहरालगत व श्री . कमलादेवी मंदीर परीसरा जवळ आहे . या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे . या फॅक्टरीतून तयार होणाऱ्या राखेचे लोट संपूर्ण शहरात व घराघरांत पडत असून यामुळे नागरीकांना श्वसनाचे आजार बळावले असून सर्वसामान्य जनतेच्या स्वच्छतेचा व आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे . तरी या बाबींची गंभीर दखल घेवून तातडीने या शुगर फॅक्टरीने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविली आहे काय? असल्यास ती कार्यान्वित आहे का? नसल्यास त्वरीत प्रदूषण बंद करणेबाबतच्या उपाययोजना करणेबाबतच्या आपले स्तरावरून सूचना देवून कार्यवाही करणेत यावी . त्याचबरोबर सदर कारखान्यातून मळी मिश्रीत पाण्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे आसपास मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत असून परिसरातील पाण्याच्या स्तोत्राचा दर्जा खालावला असून शेतजमिनींचा पोत खराब होत आहे .या बाबींचा गांभीर्याने विचार करून प्रदूषण बंद करणेबाबत कार्यवाही साठी तातडीने आदेश व्हावेत . या निवेदनाच्या प्रती कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उप – प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना दिल्या आहेत .
; करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षणाची समान संधी मिळावी आणि जिल्हा परिषद शाळांमधील…
करमाळा, दि. ११ (प्रतिनिधी) : मातीच्या कुशीत जपलेले बीज उद्याच्या समृद्ध सृष्टीची हमी देते, तर…
करमाळा प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…
करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…