Categories: करमाळा

जयप्रकाश बिले सर यांचे भाच्चे डाॅ.रविंद्र पवार यांनी केली पाच वर्षाच्या रशियन मुलाची  हृदय शस्त्रक्रिया

‍करमाळा प्रतिनिधी भैरवनाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य जयप्रकाश बिले सर यांचे भाच्चे डॉक्टर    रवींद्र पवार यांनी कोल्हापूर येथील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये पाच वर्षीय रशियन बाळाची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली आहे. बाळाला ॲट्रीयल सेप्टल डिफेक्ट या आजाराचे निदान झाले होते. या आजारात फुफ्फुसात अतिरिक्त रक्तप्रवाह होतो. त्यामुळे दम लागणे, घाम येणे ,लवकर थकवा येणे, वजन न वाढणे ,असे लक्षणे दिसून येतात ही छिद्र लहान असतील तर बाळांना त्रास होत नाही पण मोठी असेल तर छातीमध्ये वारंवार संसर्ग होतो याबद्दल डॉक्टर रवींद्र पवार म्हणाले की या रोगात हृदयाच्या वरच्या दोन्ही कप्प्यामधील पडद्याला जे छिद्र असते त्या विशिष्ट चक्तीने बंद करण्यात येते या प्रक्रियेत विना शस्त्रक्रिया मांडीच्या नसेतून एका छोट्याशा नळीद्वारे चक्ती हृदयाच्या आतपर्यंत पोहोचण्यात येते. या चक्कतीच्या मदतीने एएसडी बंद करण्यात येते. ही चकती शरीराचे एक भाग बनवून जाते ही प्रक्रिया कॅथ लॅबमध्ये करण्यात आली. यावर अवघ्या 25 मिनिटात यशस्वीरित्या उपचार करण्यात आले व दुसऱ्या दिवशी बाळाला घरी सोडण्यात आले. हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत शहा म्हणाले की हॉस्पिटलमधील हृदयरोग विभाग पश्चिम महाराष्ट्रात अग्रेसर आहे. सर्व सुविधानियुक्त व आधुनिक कॅथलॅबमुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया सर्व वयोगटातील रुग्णांसाठी सहज करता येतात असे त्यांनी सांगितले.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

13 mins ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

41 mins ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

1 day ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

3 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

3 days ago