करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा गटसचिवांची सह . पतसंस्थेच्या संचालक पदी करमाळा तालुका देखरेख संघाचे सहाय्यक सचिव बबनराव मेहेर यांची करमाळा तालुक्यातून संचालक पदी बिनविरोध निवड झाली . जिल्हा पतसंस्थेच्या संचालक पदी निवडीसाठी सोलापूर जिल्हा मध्य .सह . बँकेचे व्हा . चेअरमन तथा माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व गटसचिवांची बैठक पार पडली . या वेळी माजी आ. जगताप यांनी सर्वांची मते आजमावून घेतली व सर्वानुमते मेहेर यांचे नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले . बिनविरोध निवडीनंतर माजी आमदार जगताप यांचे शुभहस्ते मेहेर यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप, जिल्हा बँकेचे सिनियर बँक इन्स्पेक्टर अभयसिह आवटे, बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षिरसागर, निवृत्त गटसचिव नामदेव साबळे, रमेश वीर,सुनील ढाणे यांचेसह सर्व गटसचिव उपस्थित होते .
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…