करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना संघर्षानंतर तीन वर्षानंतर सुरू होऊनही आदिनाथवर सभासदाची शेतकरी कामगाराची श्रध्दा सद्भभावना असल्याने हा कारखाना उशिरा सुरू होऊनही उत्तमरीत्या गाळप करीत आहे .साखरेचे उत्पादनही चांगले होत असून रोज कारखाना व येणाऱ्या गाड्यांची संख्या पाहता आदिनाथ चांगले गाळप करणार असे चित्र सध्या दिसत आहे. गाळपास येणारा ऊस मोठ्या प्रमाणात येत असून जागेवर वाहतुकीचे पेमेंट व काटा पेमेंट मिळत असल्यामुळे आदिनाथकडे शेतकरी सभासदाचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करमाळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून हे चांगले चित्र असून येणारे काळामध्ये उसाचे क्षेत्र वाढत असल्यामुळे अतिरिक्त उसाचा गाळपाचा प्रश्न आदिनाथ कारखान्याने सोडवला जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये राजकारणाचे समीकरण बदलण्याचे सामर्थ्य आदिनाथ कारखाना करणार असल्याने आदिनाथ कारखाना बागल गट पाटील गट एकत्र येऊन चालवत असून करमाळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून हे सकारात्मकतेचे उत्तम उदाहरण आहे. आदिनाथ कारखाना उत्तमरीत्या चालवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वरदहस्त लाभला असून शिंदे सरकारचे समर्थन या कारखान्याला मिळाले असल्याने माजी आमदार नारायण आबा पाटील बागल गटाच्या नेत्या सौ. रश्मी दिदी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना जोमाने चालत आहे. कारखाने यशस्वीरित्या चालवण्यासाठी आदिनाथ कारखान्याची चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे संचालक नितीन जगदाळे नानासाहेब लोकरे, लक्ष्मण गोडगे, दिलीप केकान डॉक्टर हरिदास केवारे, राजेंद्र पवार, यांच्यासह सर्व संचालक कामगार परिश्रम घेत असून आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप कसा होईल याकडे सर्वांचा ओढा आहे. आदिनाथ कारखाना चालू करण्यापासून यशस्वीरित्या घोडदोड करण्यासाठी आदिनाथ बचाव समितीचे हरिदास डांगे साहेब रामदास झोळ सर जयप्रकाश बिले सर, डॉक्टर वसंतराव पुंडे हे आदिनाथ कारखाना गाळप करण्यासाठी करत आहे एकंदर आदिनाथ साखर कारखाना आदिनाथाच्या कृपेने यशस्वीपणे वाटचाल करत आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…