प्रतिनिधी
दि. ३/२/२०२३ रोजी काळे परिवारात आगळा वेगळा विवाह संपन्न झाला. सदर मौजे आढळगांव ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथील काळे परिवारात कै. संदिप विठ्ठल काळे यांचे दुर्धर आजाराने दु:खद निधन झाले
कै.संदीप काळे हे बेकर गेजेस प्रा.लि.पुणे ठिकाणी कंपनीत कार्यरत होते. त्यांना सालस,गुणी, शांत अशी पत्नी शामल होती. संसाराची गाडी आनंदाने जिवनाची वेगवेगळी वळणे घेत चालली होती. अशातच कै.संदिप काळे यांना आजाराने मध्येच गाठले. कै. संदिप काळे यांना ऐन उमेदीच्या वळणावर मृत्यूने गाठलं. संसार वेल कोलमडली. त्यांना दोन लहान मुल आहेत मुलांचे यथोचित संगोपन वडीलां शिवाय कसे होणार…? श्रीमती शामल हिच्या जीवनाचा विचार करुन गव्हाणे परिवार पाटोदा ता. जामखेड जि. अहमदनगर व श्री काळे परिवार यांनी एकत्र बसून विचार करूण यातून मार्ग काढण्याचा विचार केला. काळे परिवारात कै. काळे यांचे लहान बंधू रविद्र विठ्ठल काळे हे अविवाहित तरूण आहेत. जर तिचेशी विवाह करण्यास तयार असतील तर आपण त्यांचा गांधर्व विवाह लावू. या प्रस्तावास प्रत्यक्षात उतरवण्यासाठी रविंद्र विठ्ठल काळे यांनी मोठ्या मनाने होकार दिला.व त्यास दोन्ही घरचे पालक यांनी अनूमती दर्शवली. ज्या योगे दोन्ही अज्ञान बालकांस हक्काचे काकाचं पालकत्व तर श्रीमती शामल हिस आयुष्यभर विधवा न रहाता त्याच घरात लहान दिराशी विवाह करून सामाजिक समतोल राखण्याचे काम घडत आहे. काळे व गव्हाणे या परिवाराने सामाजिक आदर्शवत असे काम केले आहे. या विवाहामुळे विधवा महिलेच्या सन्मान तर झालाच पण मुलांना कायमचं हक्काचं पितृछत्र मिळाले आहे. हा आगळा वेगळा विवाह संपन्न झाला. आज विधवा महिलांसाठी अशा प्रकारचे विवाह संपन्न झाल्यास समाजासाठी एक आदर्श पायंडा पडला जात आहे. या सकारात्मक विवाहाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. श्री प्रमोद झिंजाडे तथा बाबा यांनी त्यांना विधवा महिला सन्मान समितीचे वतीने शुभेच्छा पाठविल्यास आहेत.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…