Categories: करमाळा

माणसांच्या गर्दीतला माणूस- गुरुवर्य विलासजी घुमरेसर.

 

आज राहून राहून मंगेश पाडगावकरांची कविता आठवते. कविता आठवते कारण ती कधीकाळी मनात साठवून ठेवलेली असते.
आज कविता आठवायचं कारण म्हणजे आज सहा फेब्रुवारी आमचे आदरणीय गुरुवर्य घुमरे सरांचा वाढदिवस.
“कोलाहलात साऱ्या माणूस
शोधतो मी
गर्दीत माणसाच्या माणूस
शोधतो मी”..
यशवंत परिवाराचे आधारस्तंभ असणाऱ्या घुमरे सरांच्या
वाढदिवसानिमित्त मला आज या ओळी आठवल्या कारण या गोष्टी पलीकडं एक माणुसकी दडलेली आहे आणि याच माणुसकी संदर्भात मी इथं व्यक्त होणार आहे.
डॉ. सत्यपाल श्रीवास्तव सर सेवानिवृत्त झाले असले तरी आदरणीय घुमरे सर आणि श्रीवास्तव सरांनी त्यांच्यातला संवाद आजही जपून ठेवलेला आहे.
संवादातला आपलेपणा, ओलावा जपणारी माणसं आज दुर्मिळ होत चालली आहे. म्हणूनच घुमरे सरांचे मला मनापासून आभार मानावेसे वाटतात.
तब्येतीची चौकशी करणं, कुटुंबाची चौकशी करणं, नवीन लिखाणाबद्दल, पुस्तकाबद्दल विचारणं या गोष्टी खरंच वरवर साध्या जरी वाटत असल्या तरी त्या आपल्या वाटतात. आपल्या कुटुंबाची कोणीतरी विचारपूस करणारं आहे असं क्षणभर का होईना वाटून जातं.
आपलं कोणीतरी आहे ही गोष्टच आज पुसटशी होत चालली आहे.
त्यात ही संस्थाचालक एका शिक्षकाची निगुतीनं विचारपूस करतोय ही छोटी आणि साधी गोष्ट कुठली? ही गोष्ट मोठी आणि .. अगदी डोंगराएवढी वाटते.
यशवंत परिवाराचे आधारस्तंभ असणारे गुरुवर्य घुमरे सर फोनवर सरांशी बोलतात तेव्हा डॉ. श्रीवास्तव सर भूतकाळात जाऊन येतात आणि मग कितीतरी वेळ त्यांच्या गप्पा रंगत राहतात.
विद्यार्थ्यांच्या भविष्यावर त्यांच्या सर्वांगीण विकासावर घुमरे सर नेहमीच बोलतात. तेव्हा खूपदा वाटून जातं की खरंच आसपास, समाजात माणसांची गर्दी वाढते आहे, पण ती गर्दी असते माणूस पण हरवलेली. आत्मकेंद्रीपणाच्या चौकटीत वावरणारी ती गर्दी असते फक्त मतलबी. आणि म्हणूनच माणसांच्या गर्दीतला माणूस म्हणून घुमरे सरांचं नाव आदरानं घेतलं जातं.
आदरणीय सरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मनात एक कुतुहल आहे.
राजकारण, समाजकारण, कुटुंब मैत्री ,शिक्षणसंस्था व इतर सन्माननीय पदे भूषवत असताना माणूस म्हणून ते करमाळकरांना खूप परिचित आहेत.
कुटुंब, समाजकारण पेलतांना त्यांचे राजकीय सल्ले आजही कोणी विसरत नाहीत. राजकारणातला एक उत्कृष्ट सल्लागार म्हणून त्यांच्याकडं आजही कौतुकानं पाहिलं जातं.
राजकारणात मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग त्यांनी का अंगीकारला नसेल? याचीही कधीकधी कुजबूज कानावर येत राहते.
यशवंतराव चव्हाण महाविद्यालय ही शिक्षणसंस्था एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली म्हणून सरांचं नाव आदरानं घेतलं जातं तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सतत धडपडणारं व्यक्तिमत्व म्हणून सरांची ओळख नवी नाही.
विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवणं, प्रत्येकाची आपुलकीनं विचारपूस करणं, इतरांना समजून घेऊन, ऐकून काम करणा-या सरा़ंचं नांव ठळकपणे समाजमनावर आपसूकच कोरले जात आहे.
विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान असणाऱ्या घुमरे सरांचं विचारपूर्वक मुद्देसूद बोलणं ते इतके परिणामकारक असायचं की आम्ही आजही त्यांच्या विचारावर चालत आहोत.चालत राहू! दिशा बदलण्याची प्रचंड ताकद एखाद्याच्या वाणीमध्ये असते. असे बोलले जाते ते उगाच नाही!
सर्वसामान्य माणसांसोबत थेट नातं सांगणार एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणून आदरणीय सर सर्वांना परिचित आहेतच. पण मला माझ्या कुटुंबीयांना त्यांनी आई गेल्यानंतर जो मानसिक आधार दिला ते विसरणं खरंच शक्य नाही. एखादाच्या सुखात वाटेकरी होणं आणि एखाद्याचं दुःख वाटून घेणं या दोन्ही गोष्टी आदरणीय सर खूप जबाबदारीनं पेलतात म्हणूनच सर आपल्याला एक आदर्श वाटतात.आपल्यातले वाटतात.
आई गेल्यानंतर उशिराच पण सवड काढून आलेल्या सरांनी किती तळमळीनं चौकशी केली. विचारपूस केली, भावंडाबद्दल विचारलं.मा. घुमरे सर मा. फंड सर. डॉ. श्रीवास्तव या तिघांची कितीतरी वेळ मैफिल जमली होती. मैफिलीचा विषय होता आजची बदलती शिक्षण प्रणाली, साहित्य, कला ,खेळ , समाजकारण.खरंच सर त्यावेळी किती परखडपणे आपली मत मांडत होते. साहित्य ,कला ,खेळ याविषयीही त्यांना भरभरून बोलताना त्यांच्या अभ्यासाची, विचारांची उंची मी मोजत होते. विचारांची सखोलता आणि आपले विचार कलात्मक पद्धतीनं मांडण्याचा घाट हा सरांचा व्यक्तिमत्वातला एक नवा पैलू आज इथं मला मांडावासा वाटला.
जुन्या आठवणी अधोरेखित करताना डॉ.श्रीवास्तव सहज म्हणाले की *कै.नामदेवराव जगताप यांनी शिक्षक सेवेत मला घेतलं आणि कै.दिगंबरमामा बागल यांनी सेवेत कायम करून घेतलं*.तर डॉ च्या या वाक्यावर किती दिलखुलासपणे मा.घुमरे सरांनी दाद दिली.कौतुकासपात्र असणा-या माणसाचं कौतुक करायला सर कंजूशी दाखवत नाहीत.निश्चितपणे व्यक्तिमत्व यानेच तर आणखी उठावदार होत असावे.
घरातल्या बाई मुळं आपण खरं जगणं जगत असतो.असं बोलताना त्यांनी मा.जया वहिणींचा ही विशेष उल्लेख केला.आणि विद्यार्थ्यीनी म्हणून,पतीची काळजी घेते म्हणून माझं तर अजूनही कौतुक केलं.
गुरुंचे आशीर्वाद खरंच सतत सोबत असायला हवेत. कारण वाटा सापडत जातात.
पत्रकार दिनेश जी मडके यांचेही मनापासून आभार की त्यांनी सरांवर लेख लिहाल का? म्हणून विचारणा केली आणि गुरुवर्यावर लेख लिहिण्याची संधी का म्हणून मी चुकवावी ?म्हणून मी तुरंत होकार दिला.
लेखाचा शेवटचा टप्पा मा़ंडताना
आदरणीय सरांना सांगावसं वाटतं की संघर्ष करणाऱ्या माणसांच्या यादीत आम्ही कायम असू कारण संघर्षाशिवाय व्यक्तिमत्त्व धारदार बनत नाही. हे तुम्हीच नकळतपणे आमच्या मनावर कोरून ठेवलेलं आहे. आणि आजही तेवढ्याच ताकतीनं ते तुम्ही आजच्या विद्यार्थ्यांच्या मनावर कोरत आहात.
एका सामाजिक व्यक्तिमत्त्वातून सरांना जर वजा केलं तर सर उरतात फक्त “एक भला माणूस”!. म्हणूनच माणूसपण हरवलेल्या माणसांच्या गर्दीतही सर एक माणूस म्हणून आजही आपल्या वाट्याला येतात. गोष्ट खरंच कौतुकाची वाटते. अभिमानाची वाटते.
कौटुंबिक जिव्हाळ्यात – मुलं सुना,नातवंडात रमणा-या आ.सरांना आज 6 फेब्रुवारी रोजी असणा-या वाढदिवसानिमित्त मनापासून निरामय,आरोग्यमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आणि सर.. तुमच्या यशाचं आभाळ असंच विस्तारत जाओ ही आई कमलाई चरणी प्रार्थना.

©️®️🖋️ अंजली राठोड श्रीवास्तव करमाळा.७७०९४६४६५३.

saptahikpawanputra

Recent Posts

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

11 hours ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

12 hours ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

2 days ago

२७ डिसेंबर रोजी करमाळ्यात कमलाई कृषी प्रदर्शन… निर्यातक्षम केळी व डाळिंब या विषयावरती परीसंवादाचे आयोजन… शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे पाणी फाउंडेशनचे आवाहन

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…

3 days ago

आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्था करमाळा आयोजित जाधव -पाटील हॉस्पिटलमध्ये 6 व्या मुळव्याधसंबंधी शिबिराची यशस्वी सांगता

करमाळा प्रतिनिधी  करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…

4 days ago

पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने उद्योजक संतोष काका कुलकर्णी यांचा सहकुटुंब सत्कार

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील‌ उद्योजक क्लासिक कंपनीचे ‌ मालक ‌ अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…

4 days ago