करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे गाळप जोरदार सुरू पन्नास हजार टनाचा टप्पा पार यशस्वी घौडदौड कायम करमाळा प्रतिनिधी आदिनाथ सहकारी साखर कारखाना संघर्षानंतर तीन वर्षानंतर सुरू होऊन आदिनाथवर सभासदाची शेतकरी कामगाराची श्रध्दा सद्भभावना असल्याने हा कारखाना उशिरा सुरू होऊनही उत्तमरीत्या गाळप करीत पन्नास हजार ऊस टन गाळपचा टप्पा पार केला आहे. साखरेचे उत्पादनही चांगले होत असून रोज कारखाना व येणाऱ्या गाड्यांची संख्या पाहता आदिनाथ चांगले गाळप करणार असे चित्र सध्या दिसत आहे. गाळपास येणारा ऊस मोठ्या प्रमाणात येत असून जागेवर वाहतुकीचे पेमेंट व काटा पेमेंट मिळत असल्यामुळे आदिनाथकडे शेतकरी सभासदाचा ओढा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करमाळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून हे चांगले चित्र असून येणारे काळामध्ये उसाचे क्षेत्र वाढत असल्यामुळे अतिरिक्त उसाचा गाळपाचा प्रश्न आदिनाथ कारखान्याने सोडवला जाणार आहे. येणाऱ्या काळामध्ये राजकारणाचे समीकरण बदलण्याचे सामर्थ्य आदिनाथ कारखाना करणार असल्याने आदिनाथ कारखाना बागल गट पाटील गट एकत्र येऊन चालवत आहे. करमाळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून हे सकारात्मकतेचे उत्तम उदाहरण आहे. आदिनाथ कारखाना उत्तमरीत्या चालवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वरदहस्त लाभला असून शिंदे सरकारचे समर्थन या कारखान्याला मिळाले असल्याने माजी आमदार नारायण आबा पाटील बागल गटाच्या नेत्या सौ. रश्मी दिदी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना जोमाने चालत आहे. कारखाने यशस्वीरित्या चालवण्यासाठी आदिनाथ कारखान्याची चेअरमन धनंजय डोंगरे व्हाईस चेअरमन रमेश कांबळे संचालक नितीन जगदाळे नानासाहेब लोकरे, लक्ष्मण गोडगे, दिलीप केकान डॉक्टर हरिदास केवारे, राजेंद्र पवार, यांच्यासह सर्व संचालक कामगार परिश्रम घेत असून आपल्या क्षेत्रातील जास्तीत जास्त ऊस गाळप कसा होईल याकडे सर्वांचा ओढा आहे. आदिनाथ कारखाना चालू करण्यापासून यशस्वीरित्या घोडदोड करण्यासाठी आदिनाथ बचाव समितीचे हरिदास डांगे साहेब प्रा. रामदास झोळ सर जयप्रकाश बिले सर, डॉक्टर वसंतराव पुंडे हे आदिनाथ कारखाना करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करत आहे एकंदर आदिनाथ साखर कारखाना आदिनाथाच्या कृपेने यशस्वीपणे वाटचाल करत आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व वाहन मालकांच्या तसेच सकारात्मक बातम्या देऊन पत्रकारांनी सहकार्य केल्यामुळे आदिनाथ सहकारी कारखान्यांनी पन्नास हजार टण गाळपाचा टप्पा पार केला आहे.
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…
करमाळा प्रतिनिधी सध्याच्या आधुनिक काळात पत्रकारिता क्षेत्रात मोठ्या संख्येने नवोदित आणि होतकरू तरुण वर्ग…
करमाळा : प्रतिनिधी करमाळा शहरासह तालुक्यातील नागरिकांसाठी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात महत्त्वाची भर पडणार असून, जाधव-पाटील हॉस्पिटलमध्ये…