पोटेगाव प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील सर्वात जुना असणारा
( 30वर्षांपूर्वी ) सीना नदीवर झालेला पोटेगाव येथील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा होय.या बांधाऱ्याच्या दुरुस्ती साठी वारंवार मागण्या केल्या जात होत्या. नादुरुस्त असणारा हा बंधारा अतिवृष्टीमुळे निकामी झाला होता. या बांधऱ्यावरून मुख्यत्वेकरून बाळेवाडी, पोथरे, पोटेगाव, निलज आदी गावांना त्याचा लाभ मिळत होता. परंतु गेल्या 10 ते 15 वर्षांपासून या बंधाऱ्यांमध्ये पाणी साठत नसल्यामुळे त्याचा फायदा कोणालाही होत नव्हता.
आ. संजयमामा शिंदे हे गाव भेट दौऱ्यानिमित्त मौजे निलज या ठिकाणी आले असता गावाकरी मंडळींनी पोटेगाव बांधऱ्याचा प्रश्न उपस्थित केला. लागलीच आ.संजयमामा शिंदे यांनी अधीक्षक अभियंता डॉ ह. तू. धुमाळ मुख्य (विप्र )पुणे यांच्याशी फोनवरून सूचना केल्या.
लागलीच दुसऱ्या दिवशी डॉ धुमाळ,धी. बा. मुख्य अभियंता, श्री धीरज साळे, अधीक्षक अभियंता सोलापूर,एम. टी. जाधवर कार्यकारी अभियंता सोलापूर,एस. के. आवताडे उप अभियंता करमाळा असे सर्व वरिष्ठ अधिकारी पोटेगाव च्या बांधऱ्याची पहाणी करण्यासाठी आले .या दुरुस्ती साठी जवळपास 4 कोटी रुपये निधी ची आवश्यकता आहे. सदर निधी मधून या बंधाऱ्याचे काम मजबूत होईल अशी अपेक्षा या भागातील नागरिक करीत आहेत.
करमाळा प्रतिनिधी "वृत्तलेखन ही एक कला असून ते फक्त माहिती देणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नाही,…
करमाळा प्रतिनिधी : महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशन (MESTA) यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय…
करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…
करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…
जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…
* करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक अकलूज…