करमाळा प्रतिनिधी अकलूज जिल्हा सोलापूर येथे शालेय राज्यस्तरीय आर्चरीच्या सतरा वर्ष वयोगटाखालील स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये इंडियन राउंड प्रकारात करमाळा तालुक्यातील वरकुटे येथील वैष्णवी पाटील या विद्यार्थिनीने वैयक्तिक एक कांस्य व सांघिक सुवर्णपदक मिळविले आहे. या यशाने राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिची निवड झालेली आहे.
पाटील सध्या गुरुकुल पब्लिक स्कूल या शाळेमध्ये इयत्ता नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर मोडनिंब तालुका माढा या ठिकाणी धनुर्विद्या या खेळाचा सराव करत आहे. तिला प्रशिक्षक विठ्ठल भालेराव यांचे मार्गदर्शन मिळत आहे. या स्पर्धेत 40 मीटर अंतरावरून खेळताना 360 पैकी 328 गुण मिळवून ती तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
या अगोदर पुणे येथे झालेल्या शालेय विभागीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवला होता. यापूर्वी गोवा येथे झालेल्या जुनियर नॅशनल स्पर्धेमध्ये वैयक्तिक तीन रौप्य पदके व एक सांघिक सुवर्णपदक देखील मिळवलेले आहे. या यशाबद्दल सर्व स्तरातून वैष्णवीचे कौतुक होत आहे.
–
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी श्री. तात्यासाहेब जाधव यांची, तर…
करमाळा (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करमाळा येथील श्री कमलाभवानी देवीच्या मंदिरात…
करमाळा प्रतिनिधी सहकार, विश्वास आणि ग्राहकाभिमुख सेवेच्या बळावर आर्थिक प्रगतीचा नवा अध्याय सुरू करण्याच्या दिशेने…
करमाळा प्रतिनिधी उसाला प्रतिटन चार हजार रुपये दर मिळावा, यासह शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या नऊ…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील शिवाजीनगरमधील रहिवासी तथा सिव्हिल इंजिनिअर प्रसिद्ध क्राॅन्ट्रक्टर श्री. शैलेश मधुकर खडके…
करमाळा प्रतिनिधी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस, सैन्यदल, एनडीए व अग्निवीर यांसारख्या संरक्षण आणि शासकीय…