करमाळा तालुका खरेदी विक्री संघाची निवडणुक बिनविरोध, जगताप गटाचे वर्चस्व कायम

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुका सह .कृषी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणुक १५ जागांसाठी १५ अर्ज आल्याने बिनविरोध पार पडली आहे . अर्ज दाखल करणाऱ्यांमधे माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभुराजे जगताप, महादेव कामटे, महादेव डुबल,गोरख (दादासाहेब ) लबडे, रामदास गुंडगिरे, हनुमंत ढेरे, जनार्धन नलवडे, मज्जिद खान, शहाजी शिंगटे, सर्जेराव घरबुडवे, किशोर भगत, महेश कांबळे, सौ .नंदिनी जगताप, सौ .मनिषा धोंडे यांचा समावेश आहे . निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक दिलिप तिजोरे कामकाज पाहत आहेत . खरेदी विक्री संघावर स्थापने पासून जगताप गटाचे वर्चस्व आहे . करमाळा तालुका खरेदी विक्री संघाची माजी आमदार देशभक्त नामदेवराव जगताप यांनी स्थापना केली असून आजवर कै .नामदेवराव जगताप, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळली आहे . आता जगताप गटाचे युवानेते शंभुराजे जगताप यांची संचालक मंडळात वर्णी लागल्यामुळे त्यांची चेअरमन पदी निवड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे . एप्रिल २०१९ मधे लोकसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षात प्रवेश करून आपल्या राजकीय जीवनाचा श्रीगणेशा करणाऱ्या शंभुराजे जगताप यांनी या निमित्ताने सहकार क्षेत्रात राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे .

saptahikpawanputra

Recent Posts

करमाळा भाजपा शहर उपाध्यक्षपदी कपिल मंडलिक यांची निवड

  करमाळा प्रतिनिधी :- भारतीय जनता पार्टी करमाळा शहराच्या उपाध्यक्षपदी युवा कार्यकर्ते तथा भाजपाचे निष्ठावान…

15 hours ago

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आश्वारूढ पुतळयाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या शुभहस्ते होणार – मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा करमाळा नगर परिषद

करमाळा प्रतिनिधी : करमाळा शहर व तालुक्यातील सर्व शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची बहुप्रतिक्षित इच्छा आता…

2 days ago

जेऊरमध्ये महावितरणविरोधात बळीराजाचा एल्गार; करमाळा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली विराट धरणे आंदोलन

​जेऊर (प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील शेतीपंपांचा विस्कळीत वीजपुरवठा आणि ग्रामीण भागातील सिंगल फेज विजेच्या लपंडावाविरोधात आज…

2 days ago