करमाळा प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अत्यंत संवेदनशील मुख्यमंत्री असून विशेषता आरोग्याच्या प्रश्नात अडचणीत आलेल्या रुग्णाला मदत करण्याची त्यांची भावना व ते करत असलेले प्रयत्न यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक रुग्णाला आपल्याला मदती मदत करणारा कोणीतरी आहे अशी विश्वासाची भावना एकनाथ शिंदे च्या रूपाने निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी दिली
एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा उपजिल्हा रुग्णालय व श्री कमला भवानी ब्लड बँकेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे तालुकाप्रमुख देवानंद बागल शहर प्रमुख संजय पाटील युवा सेनेचे निखिल चांदगुडे राहुल कानगुडे विशाल गायकवाड वैद्यकीय मदत पक्षाचे रोहित वायबसे नागेश शेंडगे शिवकुमार चिवटे आजिनाथ वस्तादकोळेकर
प्रदीप बनसोडे संजय जगताप केशव साळुंखे शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण पांडुुुुरंंग जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते
यावेळी बोलताना विलासराव घुमरे म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारा व सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याला मिळाला आहे सामान्य माणूस कष्टकरी कामगार थेट मुख्यमंत्र्याला वर्षा बंगल्यावर जाऊन भेटू शकतो. आपल्या अडचणी मांडू शकतो असा सर्वसामान्य मिसळणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आहे त्यांच्या संवेदनशील व्यक्तिमत्त्वामुळे महाराष्ट्रातील आरोग्य क्षेत्राला बळकटी मिळाली असून सर्वसामान्य जनतेला आपल्याला आजारी पडल्यानंतर कोणीतरी मदत करणार आहे अशी भावना एकनाथ शिंदे यांच्यामुळे निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…