करमाळाा प्रतिनिधी सोलापुर ते मुंबई करिता नव्याने वंदे- भारत एक्सप्रेस चालु झालेली असुन, सोलापुर शहर, कुर्डुवाडी आणि शहरी भागातील उदयोजकांकरीता ही एक्सप्रेस नक्कीच चांगली आहे. या एक्सप्रेस च्या तिकीटांचा विचार करता, या गाडीतुन सर्वसामान्य माणसाला प्रवास करणे शक्य नाही. वस्तुतः रेल्वे मंत्र्यांनी सर्व सामान्यांचा विचार करून गरीबरथ एक्सप्रेस सुद्धा चालु करायला पाहीजे. परंतु तळागाळातील लोकांना नेहमीच दुय्यम वागणुक मिळताना दिसत आहे. रेल्वे मंत्री लालुप्रसाद यादव यांनी त्यांचे कार्यकाळात रेल्वे चे तिकीट कमी करून उत्पन्न वाढविले होते. परंतु आज वेगळी परिस्थिती आहे. आमचे पारेवाडी रेल्वे स्टेशन आणि परिसरातील प्रवासी बांधव १९९७ पासुन एक्सप्रेस गाडीचा थांबा मागत आहेत.. आजही या स्टेशनवरील रेल्वे टिकीटाचे बुकींग चांगले होते.. परंतु अनेकवेळा आश्वासने मिळुनही एकही एक्सप्रेस गाडी थांबत नाही.. रेल्वे रोको आंदोलन करूनही आजपर्यंत दाद दिलेली नाही. त्यामुळे आमचे पारेवाडी रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मागणी कायम असुन याबाबत आमदार. संजयमामा शिंदे, खासदार. रणजितदादा निंबाळकर यांनाही आम्ही निवेदन दिलेले आहे.* वंदे भारत एक्सप्रेस सोलापुर, पुणे, मुंबई च्या प्रवाशांच्या सेवेसाठी योग्य आहे.. अशीच एखादी एक्सप्रेस सर्वसामान्यांसाठी असावी आणि त्या गाडीला पारेवाडी रेल्वे स्टेशनवर थांबा द्यावा अशी आमची मागणी आहे. असे मत ॲड. अजित विघ्ने यांनी मांडले आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…