करमाळा प्रतिनिधी मंगेश महादेव बदर यांचा करमाळा तालुक्यातील घोटी गावामध्ये शेतकरी कुटुंबात जन्म झाला. गावामध्ये गणेश उत्सवात चित्रपट दाखवले जात असे ते चित्रपट पाहून मंगेश बदर यांचे चित्रपटाबद्दल आकर्षण वाढत गेले. आणि अगदी लहान वयात चौथी पाचवी चे असताना भविष्यात आपण चित्रपट निर्मिती करण्याचा छंद बाळगला आणि त्या दिशेने त्यांनी धडपड चालू केली. गावात त्यावेळेस व्हिडिओ सेंटर ही संकल्पना चालू झाली होती त्यावेळेस मंगेश यांनी चित्रपट पाहण्यासाठी शाळा सोडून व्हिडिओ सेंटर मध्ये कामाला राहिले काही दिवसात शाळेत जात नाही म्हणून घरच्यांनी त्याला मारहाण केली त्यानंतर त्याने घर सोडून पळून गेला. पळून जाऊन टेंभुर्णी येथील धनश्री बार मध्ये काही महिने साफसफाई चे काम केले. हे त्यांच्या दाजीला माहित पडल्यास ते त्याला कालठण नंबर एक या त्यांच्या गावी घेऊन गेले आणि त्या ठिकाणी त्याला शाळेमध्ये टाकले नववी ते बारावीचे शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केले तरी पण त्यांना चित्रपट बनवण्याचा छंद हा गप बसू देत नव्हता त्यानंतर त्याने मुंबईला जाऊन गोरेगाव फिल्म सिटी च्या आजूबाजूला चकरा मारणे सुरू केले तब्बल सहा वर्षे फिरून देखील फिल्म सिटी मध्ये त्यांना कोणी गेटच्या आत मध्ये देखील घेतले नाही त्या ठिकाणी त्यांना एक लक्षात आलं की शिक्षणाने आपण काही गोष्टी मिळू शकतो त्यानंतर त्यांनी करमाळा या ठिकाणी येऊन ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतले यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या ठिकाणी त्यांनी ग्ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नंतर न्यू आर्ट कॉलेज अहमदनगर या ठिकाणी जाऊन रीतसर फिल्म मेकिंग चे शिक्षण घेतले त्यानंतर मुंबईला जाऊन जय मल्हार ,एजंट राघव, चिडियाघर या टीव्ही मालिकांना असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले त्यानंतर मिलिंद शिंदे यांच्यासोबत “रे राया” या चित्रपटाला असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले. मिलिंद शिंदे सोबत काम करत असताना मंगेश बदर यांचे काम पाहून मिलिंद शिंदे प्रभावित झाले आणि त्यांना फिल्ममध्ये अभिनय करण्याचे आणि फिल्मसाठी सहनिर्माता म्हणून काम करण्याचे सहकार्य केले. 2019 मध्ये मंगेश बदरने मदार या मराठी चित्रपटाला सुरुवात केली मदार हा चित्रपट दुष्काळ भागातील पाणीटंचाईमुळे गावातील होणारे हाल आणि माणसा माणसांमध्ये होणारे तेड दाखवण्यात आले आहे. मदार हा संपूर्ण चित्रपट घोटी, करमाळा आणि केम या ठिकाणी चित्रित करण्यात आलेला आहे.या चित्रपटाला महाराष्ट्र शासन अधिकृत २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये मराठी चित्रपट स्पर्धा विभाग यात निवड झालेली. या विभागात महाराष्ट्रातून फक्त सात चित्रपट निवडले होते. त्यामध्ये मदार ५ पुरस्कार मिळाले आहेत. 2 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारी यादरम्यान हा फेस्टिवल पुणे येथे झाला आहे. मंगेश बदर यांचे भविष्यातील चित्रपट हे ग्रामीण भागातील तरुणांच्या समस्या, शिक्षण ,शेतकऱ्यांच्या समस्या, यावर आधारित असणार आहेत यासाठी त्यांचे लेखन चालू आहे लवकरच ते पुढील चित्रपट करणार आहेत.