करमाळा एमआयडीसीला उजनीतून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा सर्वे करा उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश

 

करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करमाळा कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा नसल्यामुळे उद्योजक येत नाहीत यामुळे तात्काळ उजनी धरणातून करमाळा एमआयडीसीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा सर्वे करा असे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापूर येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले

नियोजन भवन सोलापूर येथे सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील प्रश्नसंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
या बैठकीत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळ्यातील एमआयडीसी बद्दल अनेक प्रश्न मांडले
करमाळा एमआयडीसीतील भूखंडाचे दर कमी करावेत छोटे छोटे भूखंडाची निर्मिती करावी शिवाय या एमआयडीसी मधील पाणी उपलब्ध नसल्यामुळे मोठे उद्योजक येत नाहीत यामुळे तात्काळ पाण्याचा प्रश्न सोडवावा असे प्रश्न मांडले या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर एमआयडीसी ची डेपुटी इंजिनियर श्री मगर साहेब प्लॅनिंग डायरेक्ट राजेंद्र गावडे सांगली रिजनच्या कार्यकारी संचालिका श्रीमती बिरजे मॅडम एमआयडीसी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते
त्यावेळी महेश चिवटे आणि प्रश्न उपस्थित केल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या प्रश्नावर मार्ग काढावा व उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा मी निधी उपलब्ध करून देतो असे सांगितले

यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की करमाळा एमआयडीसीची भूसंपादन होऊन पंचवीस वर्षे उलटून गेलेले आहेत अद्याप एकही उद्योग येथे आलेला नाही कोणी प्लॉट घ्यायला येथे धजवत नाही अनेक जणांनी प्लॉट घेऊन या ठिकाणी परत दिले आहेत सध्या या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून एक विहिरीचे काम सुरू आहे
ही एमआयडीसी सुरू न झाल्यामुळे करमाळ्यात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे तरुणांच्या हाताला काम नाही यामुळे तात्काळ ही एमआयडीसी सुरू करण्याची गरज आहे येत्या दोन वर्षात किमान दहा तरी उद्योग या ठिकाणी उभा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले

बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा एमआयडीसीला उजनी धरणातून कायमस्वरूपी पाईपलाईन करावी जेणेकरून उद्योग या ठिकाणी येतील ही मागणी केली यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ याचा सर्वे करण्याचे आदेश दिलेेेे

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

5 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago