प्रतिनिधी घारगाव येथील गवळी पोतराज बाबांच्या संजीवन समाधीला 55 वर्ष झाली आहेत भाविकांना आज त्याची प्रचिती येत आहे.संजय सरवदे यांच्या आजोबा एकनाथ यांना गवळी पोतराजाने दर्शन दिले असुन ही सेवा करीत बापुना प्रत्यक्ष दर्शन दिले त्यामुळे पोतराजाची सेवा आजोबा एकनाथ करीत होते त्यानंतर बापु सरवदे सेवा करीत होते सेवा करीत असताना नागराजाच्या रुपाने दर्शन दिले त्यानंतर भाविक भक्तांना संकटातुन मार्ग मिळण्यासाठी अनेक लोकांना अंगारा लावुन बऱ्याच जणाना अडचणीतुन मार्ग मिळाल्याचा अनूभव घेतला आहे अनेक लोकांच्या अडीअडचणी पोतराज बाबा समाधीच्या दर्शनाने पुर्ण होतात अशी भाविकांची श्रध्दा आहे. करमाळा तालुक्यातील घारगाव येथे पोतराज बाबा नावाचे देवस्थान असून सुमारे एक दशकापासून या देवस्थानाची प्रचिती आणि भाविकांना येत आहे घारगाव येथील बापू सरवदे यांचे वडील एकनाथ सरवदे यांना झाडाखाली पोतराज बाबाच्या रूपाने नागदेवतेचे दर्शन झाले होते त्यावेळी पासून त्यांनी पोतराज बाबाची सेवा करण्याची व्रत जपले त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सुपुत्र संजय सरवदे यांचे वडील बापू सरवदे यांना पोतराज बाबाचा दृष्टांत झालेले ते त्या पोतराज देवस्थानाची सेवा करू लागले हळूहळू पोतराज बाबाच्या कृपेने भाविकांच्या दर्शन मात्र समस्या दूर होऊ लागल्या पोतराज बाबांच्या आशीर्वादाने बापू सरवदे करमाळा तालुका परंडा तालुका उस्मानाबाद या ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांना मार्गदर्शन करीत असत पोतराज बाबाच्या अंगाऱ्यांने अनेक भाविकांना गुण आला असल्याचे भाविक भक्त सांगतात. पोतराज बाबाच्या या समाधीला आता 55 वर्षे पूर्ण झाले असल्याने या समाधीची पडझड झाले असल्याने भाविकांचे श्रद्धास्थान असलेले पोतराज देवस्थानच् जीर्णोद्धार करण्यासाठी घारगावचे सुपुत्र संजय सरवदे व त्यांच्या कुटुंबाने पुढाकार घेतला असून भाविक भक्ताच्या सहकार्यानेच या समाधीचा जिर्णोद्धार करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे या समाधीचा जिर्णोद्धार एक व्यक्ती ही करू शकतो परंतु सर्वांचा वाटा सर्वांना त्याचे पुण्य मिळावे म्हणून आम्ही प्रत्येकाकडून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून वर्गणी घेऊन जिर्णाध्दाराचे काम करत असल्याचे संजय सरवदे यांनी सांगितले.ज्या भक्तांना पोतराज बाबाच्या समाधी जिर्णाध्दार कामासाठी आर्थिक मदत करून या पुण्यकर्म सहभागी व्हायचे आहे त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय सरवदे मोबाईल नंबर 8975716000 यांच्याशी संपर्क साधून आर्थिक अथवा साहित्यरुपात मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.