शेलगाव क, नेरले व अर्जुननगर – म्हसेवाडी या गावात होणार उद्घाटनांचे कार्यक्रम…
करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील मौजे शेलगाव क, नेरले, तसेच अर्जुननगर या 3 गावातील जवळपास 8 कोटी मंजूर निधीमधून काम पूर्ण झालेल्या व प्रस्तावित असलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा उद्या आ.संजयमामा शिंदे यांचे हस्ते संपन्न होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार जयवंतराव जगताप हे असणार आहेत. सदर कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आमदार संजयमामा शिंदे संपर्क कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
उद्या दिनांक 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 वाजता मौजे शेलगाव क येथे 1 कोटी 27 लाख 40 हजार निधी मंजूर असलेल्या 7 कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 2 नवीन वर्ग खोली बांधणे – 18 लाख 50 हजार , शेलगाव क – गुळसडी ग्रामीण मार्ग सुधारणा करणे – 10 लाख, शेलगाव क – सौंदे रोड ते वीर वस्ती नं.1 रस्त्यावर पुल बांधणे – 5 लाख , माळी वस्ती नंबर 2 येथे तालीम बांधणे – 7 लाख ,नवीन स्मशानभूमी शेड करणे – 3.50 लाख , जल जीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविणे – 80 लाख , बनसोडे समाज मंदिर येथे हातपंपावर सौर उर्जेवर आधारित दुहेरी पाणीपुरवठा योजना राबविणे – 3 लाख 40 हजार ही कामे आहेत.
मौजे नेरले येथे जवळपास 5 कोटी 75 लाख 39 हजार रुपये निधी मंजूर असलेल्या जवळपास 32 कामांचे उद्घाटन व लोकार्पण उद्या सकाळी 11.00 वा. होणार आहे .यामध्ये प्रामुख्याने जल जीवन मिशन योजना 96 लाख रुपये , नेरले भोत्रा पूल व रस्ता 68 लाख रुपये , आवाटी रस्ता तलाव पुनर्भरण 1 कोटी 27 लाख रुपये ,आवाटी साठवण तलाव 1 कोटी 85 लाख रुपये, आवाटी रस्ता व पुल 20 लाख रुपये, मारुती मंदिर शेजारी सभा मंडप 7 लाख रुपये, पीर साहेब दर्गा सभा मंडप 7 लाख रुपये इत्यादी कामे आहेत.
अर्जुन नगर म्हसेवाडी ग्रुप ग्रामपंचायत येथे 93 लाख 13 हजार रुपये निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा होणार आहे. यामध्ये म्हसेवाडी येथे पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 52 लाख 73 हजार रुपये , अर्जुन नगर येथे जिल्हा परिषद शाळेजवळ सभामंडप बांधणे 7 लाख ,जिल्हा परिषद शाळा नवीन वर्ग खोली बांधकाम 8 लाख ,जिल्हा परिषद शाळा संरक्षक भिंत 2 लाख ,जिल्हा परिषद शाळेत आरो प्लांट 3 लाख, मरीआई मंदिराजवळ सौर उर्जेवर आधारित पाणीपुरवठा योजना 3 लाख , म्हसेवाडी ते ननवरे वस्ती रस्ता व पूल 8 लाख ही प्रमुख कामे आहेत सदर कामांचे भूमिपूजन व लोकार्पण दुपारी 12 वाजता होणार आहे.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…