श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये सकाळ समूहाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला सामूहिक सूर्यनमस्कार कार्यक्रम शनिवार दिनांक 11 रोजी संपन्न झाला. हा कार्यक्रम करण्यासाठी पतंजली योग समिती तालुका प्रभारी श्री बाळासाहेब नरारे यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. या ठिकाणी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सुनीता मोहिते मॅडम उपस्थित होत्या .प्रथम श्री नरारे सर यांनी स्वतः सूर्यनमस्काराचे प्रात्यक्षिक करत मुलांकडून ही सूर्यनमस्कार करून घेतले. त्याचबरोबर आपले आरोग्य उत्तम राखण्यासाठी सूर्यनमस्कार कशा प्रकारे उपयोगी आहे त्याची सुद्धा त्यांनी माहिती दिली. तसेच मानसिक स्वास्थ्यासाठी सुद्धा सूर्यनमस्कार किती महत्त्वाचे आहे याबद्दलही सांगितले .आपला देश बलशाली सदृढ करण्यासाठी आपण स्वतःपासूनच सुरुवात केली तर स्वतःबरोबरच गाव ,तालुका, जिल्हा, राज्य, देश कसे बलशाली होतील याबद्दलही सांगितले. मुलांसाठी सुरू करण्यात येणारे सकाळ स्वास्थ्य सदर याबद्दल तसेच सकाळ स्वास्थ्य प्रश्नमंजुषा 2023 योजना याबाबत ही माहिती दिली. मुलांनीही आजपासून आपण सूर्यनमस्कार करणार असे आश्वासन दिले, व उत्साह पूर्वक सूर्यनमस्कार केले. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे अध्यक्ष श्री कन्हैयालालजी देवी सर संचालक श्री अमोद जी संचेती, श्री चंद्रकांत जी देवी ,श्री विजयजी दोशी, सौ सुनीता कन्हैयालाल देवी उपस्थित होते तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ अश्विनी शिरसागर मॅडम यांनी मांडले.
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…