करमाळा प्रतिनिधी संजय साखरे यंदाच्या खरीप हंगामात नामांकित कंपनीचे बियाणे शेतकऱ्यांनी मोठया प्रमाणावर खरेदी केले. पण त्याची उगवण झालीच नाही. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला.
उधार व उसनवारी करून विकत घेतलेलं बियाणे वाया गेले आहे. या संदर्भातील प्रकार राजुरी गावातील शेतकऱ्यांच्या बाबतीत घडला आहे.येथील शेतकऱ्यांनी कांदा व बाजरी चे नामांकित कंपनीचे बियाणे खरेदी केले मात्र ते उगवलेच नाही. जवळ जवळ 15 ते 20 शेतकऱ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. यासंदर्भात राजुरीचे सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी तालुका कृषी अधिकारी सुरज पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही अशा शेतकऱ्यांचा सर्व्ह करून त्याला जबाबदार असण्याऱ्या कंपनी वर गुन्हे दाखल करा संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या ,अशी मागणी सरपंच डॉ. अमोल दुरंदे यांनी केली आहे. मी नामांकित कंपनीचे कांदा बियाणे खरेदी केले होते पण ते उगवले नाही .यासंदर्भात योग्य ती दखल घेऊन संबंधित कंपनी वर गुन्हा दाखल करून मला झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी.
बापूसाहेब टापरे ,शेतकरी, राजुरी.
करमाळा : प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड…
करमाळा प्रतिनिधी महाराष्ट्र इंग्लिश मीडियम ट्रस्टीज असोसिएशन एफच्या तालुकाध्यक्षपदी जयंत दळवी यांची नियुक्ती करण्यात आली…
करमाळा : प्रतिनिधी : कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे कर्तव्यनिष्ठ मुख्याध्यापक श्री. सुनील जनार्दन जाधव यांना…
करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लब, करमाळा यांच्या वतीने बुधवार, दि.…
करमाळा प्रतिनिधी : - शेतकऱ्याच्या जीवनात बैलाला केवळ शेतीकामातील पशुधन म्हणून नव्हे, तर कुटुंबातील…
करमाळा: प्रतिनिधी शेतकऱ्यांना रासायनिक खते पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हावीत, तसेच खतांच्या विक्रीतील काळाबाजार,…