स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या जयंतीनिमित्त 9 मार्च ते 13 मार्च आठवणीतील मामा भव्य अभिनव कृषी प्रदर्शनाचे आयोजन – दिग्विजय बागल

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या सर्व क्षेत्रांमध्ये लोकनेते स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांच्या कार्याचा वेगळा ठसा व योगदान हे मोलाचे उल्लेखनीय असून प्रत्येक व्यक्तीशी त्यांचे जिव्हाळ्याचे मैत्रीचे नाते होते त्यामुळे येता 13 मार्च 2023 रोजी स्वर्गीय बागल मामांच्या जयंती निमित्ताने भव्य कृषी प्रदर्शनामध्ये आठवणीतील मामा हे स्वर्गीय मामाच्या दुर्मिळ व संपूर्ण अशा छायाचित्राचे अभिनव प्रदर्शन भरून भरवणार असल्याची माहिती श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व कृषी प्रदर्शनाचे स्वागत अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली.या पत्रकार परिषदेला कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती चिंतामणी दादा जगताप, डी ग्रुपचे अध्यक्ष विजय लावंड नगरसेवक सचिन घोलप,अमोल यादव उपस्थित होते. या कार्यक्रमाची रुपरेषा चिंतामणी दादा जगताप स्वीय सहाय्यक चंद्रशेखर जोगळेकर यांनी सांगितली. याबाबत सविस्तरपणे माहिती देताना श्री बागल यांनी सांगितले की येत्या १३ मार्च रोजी लोकनेते माजी मंत्री स्वर्गीय दिगंबरराव बागल मामा यांची ६८ वी जयंती आहे त्यानिमित्ताने नऊ मार्च १३ मार्च 2023 पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील एक भव्य कृषी प्रदर्शन करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित केले असून या प्रदर्शनास कृषी विषयक शेतकऱ्यांना मार्गदर्शन व माहिती व विविध प्रकारचे 300 स्टाॅल्स असतील या प्रदर्शनामध्ये सेंद्रिय शेती,त्यातील विविध क्रांतिकारक प्रयोग पिके व फळबागाची माहिती देणारे स्टॉल आयुर्वेदिक वनस्पती नैसर्गिक शेती शेतीतील अवजारे खते बी बियाणे प्रकारची दालने याशिवाय खाद्यपदार्थाचे विविध स्टॉल्स लहान मुलांसाठी खेळणी भव्य प्रदर्शन बनवले जाणार आहे त्याच कृती प्रदर्शनात करमाळा तालुक्याचे भाग्यविधाते माजी मंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल मामा यांच्या दुर्मिळ व संस्मरणीय छायाचित्राचे संपूर्ण स्वातंत्र्य दालन उभा करणार असून ज्या ज्या व्यक्तीशी स्वर्गीय मामांच्या कामाच्या निमित्ताने उद्घघाटने वाढदिवस सत्कार समारंभ सुखदुःखाचे प्रसंग मैत्रीच्या नात्याने अशा कोणत्याही निमित्ताने आपण सर्वांचा संपर्क स्वर्गीय मामाबरोबर आला असेल तर ते अनमोल अशा क्षणाची एखादी छायाचित्र म्हणजे ते फोटो जनतेने जयंती संमारंभ समितीकडे द्यावेत ते प्रतिनिधी आपणाकडे येतील आपणाकडून फॉर्म भरून घेतील त्या सदरचा फोटो कधीच आहे. फोटोतील व्यक्ती कोण कोण आहेत तो फोटो कोणत्या तारखेचा आहे याचा तपशील आपल्याकडून घेतील व त्यातील काही निवडक व संपूर्ण फोटोची निवड समिती करेल नंतर हे फोटो स्कॅन करून आपण डिजिटल बनवून प्रदर्शनातील आठवणीतील मामा नावाच्या दालनात जनतेसाठी पाहण्यासाठी ठेवणार आहोत. स्वर्गीय मामांनी राजकारणात काम करताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपले मैत्रीचे नाते जपले होते स्वर्गीय मामाने 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण केले त्यामुळे राजकारणात स्वर्गीय मामाचे जरी कोणाची मतभेद असतील तर ते वैचारिक पातळीवरचे होते म्हणून मनभेद कधीच नव्हते त्यामुळे विरोधक देखील आजही स्वर्गीय मामांचा वेगळा आदर करतात त्यामुळे मी व्यक्तीच्या विरोधकांनाही स्वर्गीय मामाचा मुलगा या नात्याने विनम्रपणे राजकारण विरहित आवाहन करतो की त्यांनीही आपल्याकडील जतन करून ठेवलेला अनमोल क्षणाचा फोटो आम्हाला द्यावा सर्व फोटो स्कॅन करून ते ज्याचे त्याला सुरक्षित माघारी देणार आहोत त्या मागची संकल्पना अशी आहे की स्वर्गीय मामावर संपूर्ण तालुक्याचे राज्यातील जनतेने प्रचंड प्रेम केलं की मना आमच्या कुटुंबातील मी माननीय मामी साहेब हात माननीय रेशमी दीदी यांचे पेक्षाही स्वर्गीय मामावर आपला म्हणजे सर्वसामान्य जनतेचा अधिकार सर्वात जास्त होता स्वर्गीय मामांनी करमाळा तालुका हेच आपलं कुटुंब मानले होते दिनदुबळे सर्वसामान्य गोरगरीब जनतेची त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली . आलेल्या प्रत्येक माणसाला माणुसकीची वागणूक दिली त्यामुळे या दालनासाठी सर्वांनीच आम्हाला सहकार्य करावे स्वर्गीय मामाच्या जुन्या संस्मरणीय आठवणींना त्यांच्या कार्याला व त्यांच्या अनमोल क्षणाला उजाळा देण्याचा एक अल्पसा प्रयत्न आमचा आहे. त्यामुळे आपणा सर्वाचा भरघोस प्रतिसाद मिळेल याची मला खात्री आहे तसेच कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभ व समारोप सोहळ्याला राज्यातील अनेक मान्यवर मंत्री आमदार स्वर्गीय मामाचे जुने सहकारी मित्र व हितचिंतक यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. हा कार्यक्रम एलईडी स्क्रीन लेजर किरणांच्या नरेंद्र वापर आधुनिक साऊंड सिस्टिम संगणक प्रणाली वापर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर उद्घघाटन व समारोप सोहळ्यात केला जाणार आहे या सोहळ्यात करमाळा विधानसभा कार्यक्षेत्रातील देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर शहीद जवानांच्या प्रति आदर व्यक्त करण्यासाठी शहीद जवानांच्या वारसाचा सन्मान समारंभाचे आयोजन केले आहे. या पाचही दिवसात दररोज सायंकाळी विविध असे आम्ही कार्यक्रम आयोजित केले असून त्यानिमित्त नऊ मार्च रोजी भव्य उद्घाटन समारंभ, महिलांसाठी माहेर मेळावा व हळदी कुंकू समारंभ त्याच कार्यक्रमात पाऊल एक पाऊल पुढे जात विधवा महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे शानदार आयोजन राहणार आहे. खेळ पैठणीचा कार्यक्रम एक दिवस स्वर्गीय मामाच्या आवडते वाद्य म्हणजे हलगी व लेझीम स्पर्धा आयोजित केली आहे. तर शालेय व महाविद्यालयीन मुला मुलीच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कला महोत्सवाचे आयोजन राहील या सर्व कार्यक्रमाचे नियोजन व त्या संदर्भातील आवश्यक त्या समिती गठीत केल्या असून तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती शामलताई बागल व साखर संघाच्या संचालिका नेत्या सौ. रश्मी दीदी बागल या संपूर्ण महोत्सवाच्या मुख्य निमंत्रक असून या कार्यक्रमाची संकल्पना ही विद्या विकास मंडळाचे सचिव मार्गदर्शक आदरणीय विलासराव घुमरे सरांचे आहे. आदरणीय नेत्या साखर संघ संचालिका रश्मी दीदी बागल यांच्या नेतृत्वाखाली या अभिनव व नियोजनबद्ध कार्यक्रमाची जय्यत तयारी व नियोजन सुरू असून तालुका जिल्हा व तमाम राज्यातील जनतेने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा व त्यानिमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे विनम्र आवाहन शेवटी कृषी प्रदर्शनाचे स्वागत अध्यक्ष मकाई चेअरमन दिग्विजय बागल यांनी केले आहे.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago