करमाळा तालुक्यातील यशस्वी स्ट्रॉबेरी शेती करणाऱ्या वांगीच्या विकास वाघमोडे शेतकऱ्यांचा सन्मान

करमाळा प्रतिनिधी
करमाळा तालुक्यातील वांगी क्रमांक तीन येथे स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती करून सात गुंठे क्षेत्रावर चार लाखाची उत्पन्न घेणाऱ्या विकास वाघमोडे यांचा कृषिरत्न आनंद कोठडीया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
स्ट्रॉबेरी म्हणले की आपल्यापुढे समोर उभा राहतो सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर चार परिसर उन्हाळ्यातही थंड वातावरणात असलेल्या महाबळेश्वर मध्येच स्टॉबेरी शेती होऊ शकते हा समज खोटा ठरवला आहे . त्यांनी करमाळा तालुक्यातील प्रतिकूल हवामानाही वांगी नंबर तीन येथील प्रगतशील शेतकरी विकास वाघमोडे यांनी स्ट्रॉबेरीचे यशस्वी पिक घेऊन त्याचे स्वतः मार्केटिंग करत सात गुंठे क्षेत्रावर चार लाख रुपये उत्पन्न मिळवत हा प्रयोग यश केला.त्यांनी केलेल्या धाडस जिद्द व कष्टाबद्ल त्यांचा सन्मान कृषीरत्न‌आनंद कोठडीया यांनी केला यावेळी जेऊर येथील प्रतिष्ठित व्यापारी प्रसन्न बलदोटा.सौ वर्षा कोठडीया प्रगतशील शेतकरी प्रशांत नाईकनवरे गजेंद्र पोळ उपस्थित होते यावेळी बोलताना कोठडीया म्हणाले की करमाळा तालुक्यातील अनेक तरुण शेतकरी शेतीमधील नव्या वाटा निर्माण करत आहेत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप आणि मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे वाघमोडे यांनी स्ट्रॉबेरी शेती करमाळ्यात ही यशस्वी होऊ शकते याचे उदाहरण सिद्ध करून दाखवले आहे भविष्यात या पिकाला चांगला चांगल्या संधी असून तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येत गट शेती पद्धतीने हे पीक घेतल्यास याचा नक्की फायदा होऊ शकेल अशा शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

20 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago