करमाळा विविध कार्यकारी सोसायटीवर सांवत गटाची एक हाती सत्ता करमाळा सोसायटी बिनविरोध

करमाळा प्रतिनिधी
करमाळा विविध कार्यकारी सहकारी सोसायटी या  संस्थेची निवडणुक आमदार संजयमामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व सावंत गटाचे नेते सुनील बापु सावंत यांच्या नेतॄत्वाखाली बिनविरोध झाली असुन यामध्ये सर्व साधारण गटातुन सुनील भगवान सावंत शिवराज जगताप,हरीभाऊ फंड, मनोज गोडसे, अशोक ढवळे,नागेश उबाळे,योगेश काकडे, उमेश हवालदार, महीला राखीव मधुन आरती चाॅदगुडे संगीता सुरवसे इ मां,व, मधुन संतोष बनकर,मागासवर्गीय प्रतिनिधी दासा मंडलीक एन, टी मधुन चंद्रकांत सामसे यांची बिनविरोध निवड झाली आहे.करमाळा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीसाठी निवडणुक निर्णय अधिकारी सौ,एस के मुंडे यांच्या कड़े एकुण सोळा अर्ज दाखल झाले होते त्यापैकी आज तीन उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला त्यामुळे तेरा जागेसाठी तेरा अर्ज राहील्याने सहाय्यक निबंधक दिपक तिजोरे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक निर्णय अधिकारी मुंडे यांनी आज बिनविरोध निवडीची घोषणा केली त्यांना करमाळा सोसायटी चे सचीव नवनाथ चौधरी यांचे सहकार्य लाभले.
ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी करमाळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत पं,से सदस्य अँड राहुल सावंत आदी जणानी प्रयत्न केले.यावेळी सांवत गटाचे नेते सुनील बापु सावंत म्हणाले की या संस्थेची स्थापना कै,आण्णासाहेब जगताप यांनी केली होती ते संस्थापक चेअरमन होते आज करमाळा सोसायटी ची निवडणुक विरोधी गटाने उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे बिनविरोध झाली यामुळे संस्थेचा खर्च वाचला त्यामुळे सर्व गटाचे प्रमुख व सभासदाचे आभार येणारे काळात सभासदाचा कुठलाही भेदभाव न करता कर्ज वाटप केले जाईल या संस्थेला उभारी देण्याकामी सर्व थकीत कर्जदारानी सहकार्य करावे व संस्था उभारणी साठी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

17 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

20 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

22 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago