करमाळा प्रतिनिधी स्वर्गीय दिगंबरराव बागलमामा यांचे विश्वासु सहकारी म्हणून स्वर्गीय दादासाहेब गायकवाड काम केले त्यांच्या विचाराचा वारसा जपत समाजकारणातून राजकारणाचा यशस्वी वसा जपणारे उद्योजक युवा नेते आशिषभैय्या गायकवाड यांचे कार्य प्रेरणादायी आहे असे मत मकाई साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी व्यक्त केले. कोर्टी गावचे युवा नेते मकाईचे संचालक आशिष भैया गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभात बोलत होते. या कार्यक्रमास सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक कोर्टीचे ज्येष्ठ नेते भर्तरीनाथ अभंग कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अमोल भैया झाकणे, अविनाश देशमुख, शेखर जोगळेकर होते.पुढे बोलताना म्हणाले की स्वर्गीय दिगंबरराव बागल मामांना जशी स्वर्गीय ज्ञानेश्वर गायकवाड दादा यांनी साथ दिली अशाच प्रकारे आशिष गायकवाड यांनी बंधू प्रमाणे मला साथ द्यावी कर्तुत्व दातृत्व नेतृत्व या तिन्ही गोष्टीचा अनोखा संगम आशिष गायकवाड यांच्यामध्ये पाहायला मिळतो त्यांचे अमोल झाकणे यांचे सख्ख्या भावाप्रमाणे प्रेम असून ही राम लक्ष्मणाची जोडी बागल गटाची ताकद असून एक तरुण कार्यकर्ता ते एक यशस्वी उद्योजक असलेले आशिष गायकवाड त्यांच्या वाढदिवसानिमित्त शाल श्रीफळ मनाचा फेटा बांधून केक भरून आपल्या जिवलग मित्राचा अनोख्यापद्धतीने सत्कार करून वाढदिवस साजरा केला. या सत्कार संमारंभाला आशिष भैया गायकवाड मित्र मंडळाचे कार्यकर्ते कोर्टी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमाळा शहर व तालुक्यातील अनेक मान्यवर लोकांनी युवा नेते उद्योजक आशिष भैया गायकवाड यांना दूरध्वनीवरून, फेसबुक वरून, व्हाट्सअप वरून प्रत्यक्ष भेटून सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या युवा नेते आशिष भैया गायकवाड यांचा वाढदिवस कार्यकर्त मित्र परिवाराच्या वतीने मोठया आनंदात उत्साहात साजरा करण्यात आला.