Categories: करमाळा

भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या सोलापूर जिल्हा सहसंयोजक पदी निवड झाल्याबद्दल अमरजीत साळुंखे यांचा सत्कार

करमाळा प्रतिनिधी आत्मनिर्भर होण्याचा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला दिला त्यांच्याच पावलावर पावुल ठेवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विकास कामाचा धडाका लावला आहे यावरून निश्चित राज्यही आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही असे मत नुकतेच भाजपा पंचायतराज व ग्रामविकास विभागाच्या सोलापूर जिल्हा सहसंयोजक पदी निवड झाल्यानंतर अमरजीत साळुंखे यांनी सत्कारास उत्तर देताना भावना व्यक्त केली.
केंद्र शासनाच्या अनेक योजना आहेत त्या सर्व घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकार व केंद्र सरकार यांचे समन्वय महत्त्वाचे होते आणि दोन्हीकडे एकाच विचाराचे सरकार असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, वंचित घटक यापर्यंत सर्वच योजना पोहचल्या तर निश्चितच व्यक्ती आत्मनिर्भर झाल्याशिवाय राहणार नाही
माझ्या पदाच्या माध्यमातून कटकरी, शेतकरी ,शेतमजूर ,महिला दिव्याग त्यांच्यासाठी शासनाचच्या विविध योजना आहेत त्या पोहोचविण्यासाठी निश्चित प्रयत्न करू अनेक योजना जाहीर होतात परंतु त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नाहीत यासाठी आपण गावोगावी जाऊन प्रबोधन करून येणाऱ्या अडचणी दूर करू
यावेळी त्यांचा सत्कार भाजपा माजी शहराध्यक्ष संजय अण्णा घोरपडे तसेच प्रदीप देवी यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकुर ,राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, प्रवीण होगले, अक्षय दळवी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे संतोष कांबळे ,रुपेश पाटील आदी उपस्थित होते…

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

10 hours ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

13 hours ago

आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ झरे येथे ५२५ गणेशमूर्तींचे मोफत वाटप* *सुनील बळवंत झरे यांच्या उपक्रमाचे सहावे वर्ष गणेशमूर्ती घेण्यासाठी ग्रामस्थांची उत्स्फूर्त गर्दी

करमाळा प्रतिनिधी आई-वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक व सामाजिक बांधिलकी जपत झरे (ता. करमाळा) येथील सुनील बळवंत…

16 hours ago

संगमेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांचा दुहेरी गौरव जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारांनी सन्मान

करमाळा  प्रतिनिधी श्री संगमेश्वर विद्यालय, संगोबा (ता. करमाळा)चे मुख्याध्यापक सुनील शिंदे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय…

17 hours ago

आपलं गाव- आपला विकास, गाव भेट दौऱ्याच्या माध्यमातुन करमाळा पंचायत समितीचे उपसभापती ॲड. अजित विघ्ने यांच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक

करमाळा प्रतिनिधी जिल्हा परिषद/ पंचायत समितीच्या निवडणुका मध्यंतरी पार पडल्या असुन, अनेक नवीन होतकरू नेतृत्वांना…

17 hours ago