Categories: करमाळा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशन व मुस्लिम समाजाच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नपुर्णा योजनेतील ज्येष्ठ नागरिकांना अन्नदान

करमाळा प्रतिनिधी तमाम हिंदुस्थान जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांच्या वतीने श्रीराम प्रतिष्ठान येथे निराधार वृद्ध अशा जेष्ठ नागरिक यांना अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टी करमाळा तालुका अध्यक्ष व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य मा. गणेश भाऊ चिवटे, करमाळा मुस्लिम समाजातील समाजसुधारक व विचारवंत करमाळा अर्बन बँकेचे संचालक मा. हाजी कलीम काझी ( सर ) अध्यक्ष यांच्या शुभहस्ते व प्रमुख पाहुणे करमाळा शहरातील भाजपा उप अध्यक्ष पै. अफसर जाधव, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष मा. अशपाक भाई जमादार, उद्योजक रमेश भाऊ वीर , रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव सुरज भाई शेख, करमाळा जामा मस्जिद चे विश्वस्त जमीर भाई सय्यद, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन चे उपाध्यक्ष जहाँगीर बेग, सचिव पिंटु शेठ बेग यांच्या उपस्थितीत पार पडले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गणेश भाऊ चिवटे यांनी सांगितले की तमाम हिंदुस्थान जनतेचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन स्वराज्य ची मुहुर्तमेढ उभी करून असंख्य मावळ्यांच्या साक्षीने मोगल राजवट संपुष्टात आणुन महाराष्ट्र व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले . माझी राजकीय व सामाजिक कार्याची सुरुवात देखील आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना आदर्श मानून त्यांचे विचार व आचरण आपल्या कृतीतून दाखवून देण्याचा नेहमी प्रयत्न केला आहे.आज सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊनच मी काम करत आहे व नेहमी करणार आहे यासाठी आपल्या सर्वांच्या सहकार्याची गरज आहे. करमाळा मुस्लिम समाजातील समाजसुधारक व विचारवंत मा. कलिम काझी (सर) यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की आमच्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचारच भारतातील व महाराष्ट्रातील सामाजिक ऐक्य व एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी मार्गदर्शक तत्व ठरतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या न्याय्य दानाने, सामाजिक ऐक्याने, दुरदृष्टीने, सर्व धर्म समभाव व मानवतावादी विचार ठेवून जगाला आपल्या नेतृत्वाचा आदर्श घालून दिला आहे. सर्व समाजातील लोकांनी जीवन जगताना एकमेकांचा आदरभाव ठेवून सामाजिक ऐक्याला तडा जाणार नाही याची सार्वजनिक जीवन जगताना भान ठेवावे असे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुस्लिम समाजातील युवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी आभार पिंटु शेठ बेग यांनी मानले.

saptahikpawanputra

Recent Posts

ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेत दुहेरी बाजी बुद्धिबळात प्रतीक नामदे तर कुस्तीमध्ये राम सरडे प्रथम

  करमाळा प्रतिनिधी : ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळा येथील विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत…

16 hours ago

करमाळयात गणेशोत्सवानिमित्त सर्वोदय प्रतिष्ठानची तीन दिवसीय व्याख्यानमाला अरविंद जगताप, देवा झिंजाडे, प्रभाकर साळेगावकर यांची व्याख्याने; १९ ते २१ सप्टेंबरदरम्यान आयोजन

करमाळा : प्रतिनिधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने करमाळ्यातील सर्वोदय प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही तीन दिवसीय बौद्धिक व्याख्यानमालेचे…

19 hours ago

दोन-तीन वाडे होते… पण स्वप्न मोठे होते; साखरे सरांनी घडविला राजुरीचा शैक्षणिक इतिहास! शिक्षकांच्या सामर्थ्यापुढे भव्य इमारतीही फिक्या; प्रा. डॉ. राजेंद्र दास

करमाळा : प्रतिनिधी राजुरीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना स्व. सुखदेव साखरे सरांसमोर अनेक अडचणी…

21 hours ago

ग्लोबल सायन्स इन्स्टिटयूट च्या राम सरडे चा तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक*

*  करमाळा  प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट, करमाळाचा विद्यार्थी राम धनंजय…

2 days ago

सणासुदीच्या काळात करमाळ्यातील सायंकाळचे भारनियमन रद्द करा -दिग्विजय बागल

करमाळा : प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यापासून समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळी परिस्थिती…

2 days ago