मांगी मध्यम प्रकल्पातून रब्बीचे आवर्तन सुरू -आमदार संजयमामा शिंदे

          करमाळा प्रतिनिधी पावसाळ्यामध्ये मांगी मध्यम प्रकल्प 100% क्षमतेने भरलेला असल्यामुळे व शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून मांगी मध्यम प्रकल्पातून सकाळी ‍10 वाजता उजवा व डावा या दोन्ही कालव्याद्वारे रब्बीचे आवर्तन सुरू केले असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली .सदर रब्बी आवर्तनाची पाणी पाणी वापर संस्थांच्या मागणीनुसार दिले जाणार असून जास्तीत जास्त पाणी वापर संस्थांनी पाणी मागणी अर्ज करावेत व भविष्यकाळात पाणीपट्टी भरून पाटबंधारे विभागाला सहकार्य करावे असे आवाहनही आमदार शिंदे यांनी केले आहे.

गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने मांगी मध्यम प्रकल्पावरती अवलंबून असणाऱ्या विविध गावांमधून रब्बी आवर्तनाचे पाणी सोडण्याची मागणी आमदार शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली होती ,त्याची दखल घेऊन हे रब्बी आवर्तन सुरू केलेले आहे . बिटरगाव श्री या गावाला पाणी देण्याच्या दृष्टीने नियोजन झालेले असून सायफण टाकण्यासाठी कृष्णा खोरे महामंडळाकडे मागणी केलेली असून त्यांची मंजुरी मिळाल्यानंतर बिटरगाव श्री या गावालाही मांगी मध्यम प्रकल्पाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

चौकट –
मांगी मध्यम प्रकल्पाचे उजवा व डावा कालव्याद्वारे रब्बी पिकांसाठी चे आवर्तन आज दि:- १९/०२/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता सोडण्यात आलेले आहे. तरी सदरचे पाणी हे मांगी पोथरे या गावांची मागणी आलेली असल्याने सोडण्यात आलेले आहे. सदरचे पाणी हे पुढील ८ दिवसंकरिता सोडण्यात आलेले आहे. निलज, खांबेवाडी ,करंजे या भागातील लाभधारक शेतकऱ्यांची पाणी मागणी आल्यास आवर्तनाचा कालावधी वाढविला जाईल. तरी सर्व लाभधारक शेतकऱ्यांनी पाणीपट्टी भरून वेळेत मागणी करण्याची नोंद घ्यावी.

श्री संजय अवताडे .
उपअभियंता ,पाटबंधारे विभाग .

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

4 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago