छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून हिंदू मुस्लिम एकात्मतेचे अनोखे दर्शन शिवरायांचा विचार खऱ्या अर्थाने तळागाळापर्यंत पोहोचला – ज्योतीराम गुंजवटे

 

करमाळा प्रतिनिधी करमाळा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त भव्य दिव्य मिरवणूक जामा मस्जिद समोरून जात असताना करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून एकात्मतेचे दर्शन दिसून आले असे मत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी व्यक्त केले .  छत्रपती शिवाजी महाराज एकात्मतेचे प्रतीक होते हे या आजच्या मिरवणुकीतील कृतीने दिसून आले ही मानवता छत्रपती शिवाजी महाराजांनीच शिकवली याच मानवतेवर  करमाळा तालुक्यातील मुस्लिम बांधव चालतोय याचा मला अभिमान वाटतो.श्री गणेशोत्सवामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम बांधव या उत्सवामध्ये एकत्र सहभागी होतात जामा मस्जिद वरून मानाच्या गणपतीवर पुष्पवृष्टी केली जाते हे उदाहरणही संपूर्ण देशाला आदर्श एकात्मतेचे दर्शन घडवणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराजाच्या लढाया कुठल्या धर्माविरुद्ध नव्हत्या कोणत्या जातीविरुद्ध नव्हत्या कोणत्या वर्णभेदा विरुद्ध नव्हत्या तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया या जुलमी अन्यायानविरुद्ध होत्या .त्या राजकीय लढाया होत्या त्यामुळे छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्माते ठरले या स्वराज्याचा अनमोल धागा म्हणजे सर्वधर्मसमभाव यात कोणताच भेद नाही हेच छत्रपतींच्या स्वराज्याचे वैशिष्ट्य आहे आणि आम्ही त्याच स्वराज्याचे मावळे आहोत याचा आम्हाला अभिमान आहे .रक्ताच्या नात्यापेक्षा मानवतेचे विश्वासाचे विचाराचे नाते कधी पण श्रेष्ठच असते करमाळ्यात हम सब एक है हिंदू-मुस्लीम भाई – भाई असल्याचे चित्र पाहायला मिळते .

saptahikpawanputra

Recent Posts

योगासन स्पर्धेत कु. हरिश मंडलिक तालुक्यात प्रथम; नगरसेविका सौ. सुवर्णा रोहिदास आल्हाट यांच्या हस्ते सत्कार

* करमाळा : प्रतिनिधी — साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे नगर येथील रहिवासी श्री. गोकुळ हंबेश्वर मंडलिक…

2 days ago

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाच्या वैभव सुरवसे ची विभागीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड

  करमाळा प्रतिनिधी. सरकोली तालुका पंढरपूर या ठिकाणी पार पडलेल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत कर्मवीर अण्णासाहेब…

3 days ago

उजनीच्या पाण्यावर १५ अब्ज युरोच्या एआय डेटा सेंटरची नजर! पाणी आरक्षणाला तात्काळ स्थगिती देण्याची खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची मागणी

करमाळा  प्रतिनिधी उजनी जलाशयाच्या काठावर प्रस्तावित असलेल्या सुमारे १५ अब्ज युरोच्या एआय कॅम्पस आणि ग्रीन…

3 days ago

वाढदिवसाचा आनंद शाळेसाठी; कुलकर्णी परिवाराची पाच हजारांची देणगी मल्हारच्या वाढदिवसानिमित्त राजुरी जिल्हा परिषद शाळेला मदतीचा हात

करमाळा प्रतिनिधी नातवाच्या वाढदिवसाचा आनंद केवळ कुटुंबापुरता मर्यादित न ठेवता सामाजिक बांधिलकी जपत तो शाळेच्या…

4 days ago

नवलेखक-नवकवींसाठी रविवारी कार्यशाळा* समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळातर्फे आयोजन

सोलापूर प्रतिनिधी . समरसता साहित्य परिषद, महाराष्ट्र प्रदेश, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंंबईच्या वतीने…

4 days ago

मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा पूर्ववत करा रश्मी बागल यांची पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमण ध्वनि द्वारे विनंती

  करमाळा प्रतिनिधी मांगी (ता. करमाळा) येथील मांगी तलावावरील शेतकऱ्यांचा वीजपुरवठा सरसकट बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांची…

5 days ago