करमाळा प्रतिनिधी आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये उत्तम आरोग्य हिच मोठी संपत्ती असून शरीराला व्यायाम देणे ही काळाची गरज असल्याचे मत विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष सचिव विलासराव घुमरे यांनी व्यक्त केले. अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था केंद्र नाशिक शाखा करमाळा व फिटनेस कोच महेश वैद्य यांच्या विद्यमाने आयोजित हॕप्पी फिटनेस कॅम्प सात दिवशीय शिबिराचे उद्घघाटन विलासराव घुमरे सर यांच्या हस्ते झाले प्रसंगी ते बोलत होते.अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळाचे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी,सचिव बाळासाहेब होसिंग, जेष्ठ पत्रकार विवेक येवले,ॲड लताताई पाटील, डॉक्टर श्रीराम परदेशी, गुरुवर्य विनोदकुमार गांधी, किसन कांबळे सर,डॉक्टर तुषार गायकवाड, महेश दोशी, प्रताप कांबळे, गजेंद्र विभुते सर, अमोल रनशुर, निलेश गंधे,शुभम कुलकर्णी, पत्रकार जयंत दळवी , दिनेश मडके, सचिन जव्हेरी, किसनराव कांबळे अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळयाचे उपाधक्ष रविंद्र विद्वत , निलेश गंधे ,मुन्नाशेठ हसिजा आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना घुमरे सर म्हणाले की सध्याच्या युगामध्ये मनुष्य पैशाच्या मागे धावत सुटला असुन शरीराकडे लक्ष देण्यास माणसाला वेळ नसल्याने मनुष्य आजाराने ग्रस्त झाल्यामुळे शरीर स्वास्थ जपण्यासाठी आरोग्य शिबिराचा उपक्रम स्तुत्य असुन अखिल ब्राह्मण संस्थेच्या व महेेश वैद्य यांच्या कार्यास शुभेच्छा देऊन समाजाच्या चौकटीत वाढता संपूर्ण समाजासाठी सामाजिक उपक्रम राबवावे या उपक्रमास आपले पाठबळ राहील करमाळयातील नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन विलासराव घुमरे यांनी केले. यावेळी घुमरे, येवले,पाटील, कुलकर्णी आदींचे भाषणे झाली या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नरेंद्र ठाकूर यांनी सूत्रसंचलन केले आभार प्रदर्शन सचिव बाळासाहेब होशिंग यांनी केले.