करमाळा प्रतिनिधी करमाळ्याची कुलस्वामिनी आई कमलाभवानीचा आशिर्वाद पाठीशी असल्याने मदार चित्रपटाला मोठे यश मिळाले असल्याचे मत दिग्दर्शक मंगेश बदर यांनी व्यक्त केले.मंगेश बदर यांनी सहकुंटुंब बंधु भावजय बहिण पुतण्या यांच्यासह कमलादेवी आरती करून दर्शन घेतले. श्री. कमलाभवानी देवस्थान ट्रस्ट देवीचामाळ यांच्यावतीने मंगेश बदर यांचा कोंटुंबिक सत्कार ट्रस्टच्यावतीने माजी सरपंच देवीचे पुजारी दादासाहेब पुजारी यांच्या व्यवस्थापक अशोक गाठे यांच्या हस्ते कमलादेवीचा फोटो पुस्तक हार श्रीफळ देऊन करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमास मंगेश बदर यांचे बंधू हनुमंत बदल, वहिनी शामल बदर पुतण्या शंभु बदर, बहिण धनश्री पाडुळे पत्रकार दिनेश मडके श्री कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक अशोक गाठे, पुजारी बापु पुजारी, रवींद्र सोरटे,कमलाकर सोरटे विनायक पवार, रमेश येळवणे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. करमाळ्याचे सुपुत्र दिग्दर्शक मंगेश बदर यांनी मदार चित्रपटाच्या माध्यमातून पुरस्कार मिळवुन चांगले यश मिळवले याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो.आई कमलाभवानीवर चित्रपटाची निर्मिती व्हावी अशी आमची भक्ताची इच्छा आहे.श्री कमलादेवी ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे सचिव अनिल पाटील यांच्या वतीने चित्रपट काढण्यासाठी पत्र देण्यात येणार असून याविषयी मंगेश बदर यांच्याशी चर्चा झाली आहे त्यांनी चित्रपटाबाबत विविध घटकाबरोबर चर्चा करुन सर्वाच्या सहमतीने निर्मितीच्या बाबतीत सहकार्याच्याबाबतीत सकारात्मक भूमिका व्यक्त केली आहे. माा.दादासाहेब पुजारी मा.सरपंच श्री कमलादेवी पुजारी श्री.देवीचामाळ
माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…
करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…
करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…