Categories: करमाळा

संघर्षमय जीवनात संकटावर मात करून प्रिंटिंग क्षेत्रात नावलौकिक मिळवलेले अरिहंत प्रिंटर्सचे मालक आशिष मेहता

.करमाळा तालुक्यात प्रिंटिंग क्षेत्रातील विश्वासाची अभिनव परंपरा जपणारे अरिहंत प्रिंटर्सचे मालक आशिष मेहता प्रिंटिंग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट छपाई व विनम्र तत्पर सेवेने ग्राहकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणारे निर्माण करणारे बबनराव मेहता यांचे नातु अशोक मेहता यांचे सुपुत्र आशिष मेहता यांचा जन्म 26 फेब्रुवारी 1984 साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण करमाळा येथे झाले. बी काॅमपर्यंत शिक्षण पुर्ण केल्यानंतर सोलापूर येथे प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेऊन आपल्या वाडवडीलाचा पिढीजात पांरपांरिक व्यवसाय सांभाळून त्या व्यवसायात क्रांती करण्याचे ध्येय ठरवून आशिष मेहता यांनी आपल्या कार्याची सुरुवात केली. कौटुंबिक जीवनात अनेक संकट वादळ अनेक प्रसंग येऊनही त्या परिस्थितीही न डगमगता परिस्थितीवर स्वकर्तुत्वाने धाडसाने मात केली आहे. आजोबा स्वर्गीय बबन मेहता व वडील अशोक मेहता यांचा स्वाभिमानी जगण्याचा वारसा आशिष यांनी जपून कुणाच्याही मागे न लागता त्यांनी स्वतःच्या कार्याच्या जोरावर त्यांनी ग्राहकांची मन जिंकण्याचे काम केले. लहरो से डरकर नोका पार नही होती कोशिश करने वालों की कभी हार नही होती या उक्तीप्रमाणे सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रिंटिंग क्षेत्रामध्ये अनेक बदल झाले. जुने ट्रेडलचे प्रेस होते त्यानंतर काॅम्पुटर युग आले. त्या बदलालचा स्वीकार करून आपला व्यवसाय यशस्वीपणे संभाळुन व प्रिंटिंग प्रेस वाल्याचे कामे करून सहकार्य देऊन अनेकांना आधार देण्याचे काम काम त्यांनी केले आहे. संसारिक जीवनातही सुखी संप्पन आयुष्य जगत आहे. आशिष मेहता यांचा विवाह 2011साली फलटण तालुक्यातील रावडी येथील प्रदीपकुमार शहा यांची कन्या कु.अमिषा यांच्याशी बारामती येथे झाला.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो अशी खंबीर अशी साथ अमिषा यांनी दिली आहे. पतीच्या जीवनात सुख दुखा:त साथ देत कोंटुबिक जबाबदारी पार पाडत व्यवसायातही त्या कामास हातभार लावत आहेत.त्यांच्या आई रंजना मेहता यांचा आशीर्वाद व संस्काराची शिकवण याच्या जोरावर सर्व कौटुंबिक जबाबदारी लहान वयामध्ये पार पाडून आशिष मेहता यांनी एक आदर्श मुलाची कर्तव्य बजावले आहे. आशिष मेहता यांना दोन बहिणी असून दोन्ही बहिणी विवाहीत असून सोलापूरमध्ये सुखी सांसारिक जीवन जगत आहे.त्यांचे मेहुणे यांचे त्यांच्यावर बधुंवत नाते आहे. यामध्ये अनघाताई ,आरती ताई यांनाही आशिषने लहान वयामध्ये आपल्या वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पडल्यामुळे त्याचा सार्थ अभिमान वाटतो वडीलाचे छत्र गेल्यानंतरही लहान असतानाही वडीलाची माया व माहेरपण यामध्ये ही कमतरता पडू दिले नाही. आशिष यांना आदिश एक चिंरजीव असुन तो वडींलाच्या पावलावर पाऊल ठेवून नोबल इंग्रजी शाळेत प्राथमिक शिक्षण घेत आहे. प्रेमळ मनमिळावु हास्याचा फुलोरा विनोदी व्यक्तिमत्व असलेला आदर्श कुटुंब प्रमुख आदर्श उद्योजक तसेच प्रिंटिंग क्षेत्रामध्ये विनम्र तत्पर सेवा देणारे सेवा देणारे आशिष मेहता यांचे कार्य युवा पिढीस प्रेरणादायी आहे. युवा उद्योजक मित्र आशिष मेहता यांस वाढदिवसानिम्मित लाख लाख हार्दिक शुभेच्छा

saptahikpawanputra

Recent Posts

महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे वर्गमित्रांचे तब्बल 45 वर्षांनी  संमेलन एक सुखद झुळुक

माणसाने निवृत्त झाल्यावर एकत्रित येऊन जुन्या आठवणींना उजाळा आणि मैत्रीचे नूतनिकरण करण्याची आलेली सुवर्णसंधी दवडायची…

21 hours ago

भारताचे माजी पंतप्रधान भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भाजपच्यावतीने अंगणवाडीतील चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप

करमाळा प्रतिनिधी जेष्ठ संसदपटू असलेले अटलबिहारी वाजपेयी राजकारणात चार दशक सक्रीय होते.असे मत भारतीय जनता…

2 days ago

भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची गुरुकिल्ली -साध्वी प.पू अनुराधा दिदी शेटे पंढरपूरकर

करमाळा प्रतिनिधी भागवत कथाही कल्पवृक्षासारखी असून कलियुगात देवाला प्रत्यक्ष पाहण्याची ताकद मानव जीवनाचे सार्थक करण्याची…

3 days ago

भारतरत्न माजी पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देवळाली येथे नेत्ररोग तपासणी संपन्न

करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…

3 days ago

अवैध वाळु उपसा बंद करा आमदार नारायण पाटील जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना पञ

करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…

3 days ago

करमाळ्यात रविवारी २९ डिसेंबरला होणार भव्य ग्लोबल टॅलेंट सर्च परीक्षा २०२४-२५

करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…

5 days ago