आमदार विक्रम काळे यांनी आपल्या खुमासदार शैलीत विध्यमान राजकीय, सामाजिक विषयावर चिमटे काढत तुफानी फटकेबाजी केली.
आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले, आजच्या दिमाखदार अशा क्रज्ञता सोहळ्याने मी प्रभावीत झालो असून असा कार्यक्रम आजपर्यंत मी पाहिलेला नाही. प्रा बंडगर यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील वाटचालीचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यानी बंडगरांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील योगदानाचा आवर्जून उल्लेख केला . उजनी धरणग्रस्तांच्यासाठी बंडगर यानी केलेला संघर्ष अप्रतिम असून विध्यापीठ नामांतर, पाच टीएमसी पाणी वाचवण्याच्या साठी केलेल्या यशस्वी आंदोलनाचा उल्लेख करत त्यानी शुभेच्छा दिल्या .
यावेळी भिमाखोर्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या 14 गुणवंतांचा सन्मान करण्यात आला.
यामध्ये सौरऊर्जेवर बोट निर्माण करून यशस्वी पणे चालवणार्या श्रीहरी जाधव, मंगेश जाधव यांच्यासह केळी उत्पादक संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष पदी निवड झालेल्या महेंद्र पाटील यांच्या सह सोमनाथ खराडे,जनार्दन साळुंके, सोनाली शेटे,ललिता रकटे,शैलेश भोसले,सम्रता माने,सुनंदा रोकडे भगत,हनुमंत यादव,विकास वाघमोडे, संकेत पवार,ईश्वरी निंबाळकर, हिंदवी जगताप, प्रशांत देशमुख, आदींचा सन्मान करण्यात आला.
उपस्थिताचे स्वागत ढोकरीचे सरपंच देवा पाटील, दत्ता खरात , वांगी विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन भैरवनाथ बंडगर, महादेव बंडगर, शिवाजी खरात,शुभम् बंडगर, बाबासाहेब चौगुले , अर्जुन तकिक आदिनी केलेयावेळी मकाई चे चेअरमन दिग्विजय बागल, गणेश करे पाटील, अॅड बाबुराव हिरडे यांची भाषणे झाली.यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्थेच्या वतीने सौरऊर्जेवर बोट सुरू केलेल्या श्रीहरी जाधव व मंगेश जाधव याना रोख 21000 चे पारितोषिक देवून सन्मानित केलंत तर बाकी गुणवंतांचा सन्मान सन्मान चिन्ह व मानपत्र देवून केला.प्रा शिवाजीराव बंडगर यांचाही सपत्निक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा शिवाजीराव बंडगर यांनी केले तर आभार शहाजीराव देशमुख यानी मानले .कार्यक्रमास हभप रामभाऊ महाराज निंबाळकर, निखील महाराज निंबाळकर,जि प चे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, बाजार समिती चे उप सभापती चिंतामणी जगताप, माजी जि प सदस्य भानुदास पाटील, मकाई चे संचालक संतोष देशमुख, रामभाऊ हाके,गोरख जगदाळे,बापूराव कदम, उदयसिंह मोरे पाटील,खंडाळा पंचायत समिती सभापती वंदना धायगुडे पाटील, अमरजित साळुंके, डाॅक्टर अमोल घाडगे, भिमा आबा घाडगे, बाजार समिती चे संचालक देवा ढेरे,शशिकांत केकान,रंगनाथ शिंदे, बापूराव रणसिंग, वालचंद रोडगे, आदिनाथ चे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक नानासाहेब लोकरे, संचालक पांडुरंग जाधव ,संचालक भागवत पाटील, माजी संचालक भारत आण्णा साळुंखे. वांगी नं.1चे सरपंच संतोष देशमुख, वांगी नंबर 3 चे सरपंच मयुर रोकडे, वांगी नं.4– भिवरवाडी चे सरपंच रामभाऊ सूळ, उपसरपंच डॉक्टर भाऊसाहेब शेळके सदस्य धनसिंग जयसिंगराव शेटे, वांगी नंबर 2 चे सरपंच संतोष चौधरी, उपसरपंच बशीर पटेल ,बिटरगाव चे सरपंच कुलदीप पाटील, पांगरेचे उपसरपंच विवेक पाटील, सचिन बापू पिसाळ, माजी सरपंच चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य भैरवनाथ हराळे, सामाजिक कार्यकर्ते अर्जुन तकीक, देविदास तळेकर, वांगीच्या माजी सरपंच सौ. स्वातीताई शेळके , एलआयसी विमा एजंट विठ्ठल शेळके, माजी पंचायत समिती सदस्य सुहास रोकडे, सोमनाथ रोकडे, माळशिरस चे उपनगराध्यक्ष डाॅ मारुती पाटील, माढा विधानसभा शिवसेना प्रमुख रामभाऊ टकले,दत्ता बापू देशमुख, सुधीर बापू देशमुख, तानाजी देशमुख, वांगी सोसायटी चे चेअरमन डाॅक्टर विजय रोकडे, संचालक नितीन देशमुख, विकास पाटील, अप्पासाहेब भोसले, नागनाथ मंगवडे, कृष्णा जाधव,नामदेव महाडिक, कांतीलाल महाडिक त्याचप्रमाणे युवा नेते युवराज रोकडे, माजी सरपंच संजय कदम,माजी सभापती लक्ष्मण दादा महाडीक, नितीन तकीक, विशाल तकीक, , दत्तू दादा सरडे अण्णा सरडे जयसिंग शेटे, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
करमाळा प्रतिनिधी पाठवा :- दिवंगत भाजपा नेते, भारताचे माजी पंतप्रधान तथा भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेली काही दिवसांपासून उजनी जलाशय व सीना नदीतून अवैधरित्या उपसा सुरू…
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…