तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत डोळे तपासणी मोतीबिंदू शिबिर संपन्न

करमाळा प्रतिनिधी तपश्री प्रतिष्ठान, गोसेवा समिती, दत्त पेठ तरुण मंडळ व बुद्रानी हॉस्पिटल, कोरेगाव पार्क पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक 27-2-2023 वार – सोमवार रोजी मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शिबीर घेण्यात आले. या शिबिरासाठी पुण्यातून बुद्रानी हॉस्पिटल चे डॉ.गिरीश पाटील व त्यांची टीम यांनी आलेल्या रुग्णांची तपासणी केली. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराची सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून अशोकजी पटवा ,शिवसेना करमाळा वैद्यकीय मदत कक्षाचे सहकक्षप्रमुख डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन  समन्वयक शिवकुमार चिवटे, माजी नगरसेविक आक्का बनसोडे, योग शिक्षक हनुमानसिंग परदेशी, राष्ट्रवादी चे अरुणजी टांगडे, श्री स्वामी,यांचे सह सामाजिक कार्यकर्ते श्रेणीक खाटेर उपस्थित होते.यावेळेस बोलताना श्रेणिक खाटेर यांनी मागे आतापर्यंत 4000 रुग्णाचे यशस्वी ऑपरेशन झाले असून भविष्यात ही करमाळा शहर व परिसरातील रुग्णांनी याचा लाभ घ्यावा असे अहवाहन केले. प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला बायपास चौक,देवीचा रोड येथे हे शिबीर होणार आहे असे सांगितले.या प्रसंगी बोलताना माझी नगरसेविका आक्का बनसोडे यांनी शुभेच्छा देऊन भविष्यात खाटेर यांच्या सामाजिक कार्यास कायम सहकार्य राहील अशी ग्वाही दिली.हनुमानसिंग परदेशी यांनी पुणे येथील दवाखान्यात खूप चांगल्या सोई असून, स्वछता आहे.ऑपेरेशन खूप छान होतात असे मनोगत व्यक्त केले.तसेच दत्त पेठ तरुण मंडळाच्या वतीने अरुण तांगडे यांनी खाटेर यांच्या कार्याचे कौतुक करून दत्त पेठ तरुण मंडळाचे त्यांना त्यांच्या सामाजिक कार्यात कायम सहकार्य राहील असे आश्वासन दिले.आजच्या शिबिरात अनेक रुग्णांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी जमील काझी ,गुलाम गोस , कृष्णाराज खंडागळे , पृथ्वीराज केंगार , विजय बारीदे , दिनेश मुथा, केतन संचेती, गणेश बोरा,वर्धमान खाटेर,अनंत मसलेकर,भावेश कुंकूलोळ,कोल्हार जगदीश परदेशीं,गिरीश शहा, विजय बरीदे,चंद्रकांत काळदाते, प्रीतम राठोड,संतोष भांड यांचे सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमच्या शेवटी वर्धमान खाटेर यांनी सर्वांचे आभार मानले..

saptahikpawanputra

Recent Posts

गाव तिथे भाजपा, बूथ तिथे शाखा’ अभियानाला सोलापूर ग्रामीण पश्चिममध्ये सुरुवात संघटनात्मक बांधणीला वेग भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी पांडे व धायखिंडी येथे भाजपा शाखांचे उद्घाटन

  करमाळा प्रतिनिधी  : भारतीय जनता पार्टी सोलापूर ग्रामीण पश्चिमच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर जिल्हाध्यक्ष…

6 hours ago

प्राचार्य मिलिंद फंड यांना जीवनगौरव पुरस्कार पद्मश्री ‘बिजमाता’ राहिबाई पोपेरे यांच्या हस्ते सन्मान; वसंतराव दिवेकर स्मृतिदिनानिमित्त वसंत महोत्सव उत्साहात

करमाळा  प्रतिनिधी करमाळा येथील यशकल्याणी सेवाभवन येथे श्री. वसंतराव दिवेकर यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित ‘वसंत…

1 day ago

करमाळ्यात झेडपी शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रमाचा विस्तार;* प्रस्ताव सादर करण्याचे भाजप नेते दिग्विजय बागल यांचे आवाहन

  करमाळा प्रतिनिधी, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये मराठी माध्यमासोबत इयत्ता पहिलीपासून सेमी-इंग्लिश अभ्यासक्रम…

1 day ago

करमाळ्यात श्री कमलाभवानी मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवास भक्तिमय वातावरणात प्रारंभ! विधिवत घटस्थापना; सनई, ढोल, संबळ आणि झांजांच्या निनादात देवीची आरती संपन्न

  करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कमला भवानी देवी मंदिरात शारदीय…

1 day ago