करमाळा /प्रतिनिधी/
करमाळा शिवसेनेचे वतीने संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व आरोग्य मंत्री प्राध्यापक तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली 5 मार्च 6 मार्च व सात मार्च 2023असे 3 दिवस मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये औषधे व चष्मे मोफत दिले जाणार असून या आरोग्य शिबिराचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आव्हान शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी केले आहे
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत हे करणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार नारायण पाटील राहणार आहेत
तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड दत्तकला शिक्षण संस्थेचे चेअरमन रामदास झोळ राहणार आहेत
आरोग्य शिबिरात मोफत इसीजी तपासणी महिलांच्या गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी हृदयरोग तपासणी सर्व रोग निदान शिबिर डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात येणार आहे
हे आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील तालुकाप्रमुख देवानंद बागल शहर प्रमुख संजय आप्पा शीलवंत युवा सेनेचे जिल्हा समन्वयक निखिल चांदगुडे तालुकाप्रमुख राहुल कानगुडे शहर प्रमुख विशाल गायकवाड महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष प्रियंका ताई गायकवाड शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख दीपक पाटणे सह कक्ष प्रमुख शिवकुमार चिवटे कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे उपशहर प्रमुख नागेश गुरव राजेंद्र काळे रंभापुरा शाखाप्रमुख निलेश चव्हाण वैद्यकीय सहाय्यक प्रमुख मुंबई रोहित वायबसे प्रदीप बनसोडे संजय जगताप आधी प्रयत्न करत आहेतया शिबिरात साईदीपहॉस्पिटल अहमदनगर आनंद ऋषी हॉस्पिटल अहमदनगर नर्गिस दत्त कॅन्सर हॉस्पिटल बार्शी उपजिल्हा रुग्णालय करमाळा ज्युपिटर हॉस्पिटल मुंबई या ठिकाणचे प्रसिद्ध डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत.हे आरोग्य शिबिर करमाळा येथे श्री कमला भवानी ब्लड बँक सेंटर येथे होणार आहे
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील ज्ञानसेवा सोशल फाउंडेशन संचलित ग्लोबल सायन्स इन्स्टिट्यूट करमाळा यांच्या ४ थ्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीतील नवनवीन ज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पाणी फाउंडेशन करमाळा…
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील करमाळा शहरांमध्ये असलेल्या जाधव- पाटील हॉस्पिटलमध्ये आई कमलाभवानी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या…
करमाळा प्रतिनिधी करमाळा येथील उद्योजक क्लासिक कंपनीचे मालक अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्थेचे करमाळा…
करमाळा प्रतिनिधी निमगाव (ह) येथे बुधराणी हॉस्पिटल पुणे व आधार बहु. उद्दे. संस्था, व कर्मवीर…