प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. रामदास झोळ फॉउंडेशन ने 5 मुलींना शैक्षणिकरित्या घेतले दत्तक
करमाळा प्रतिनिधी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे वाशिंबे, ता. करमाळा येथील सुपुत्र व भिगवण येथील माळरानावर शिक्षणाची ज्ञानगंगा फुलविणारे दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ सर यांचा वाढदिवस मंगळवार दि. ११ एप्रिल २०२३ रोजी मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला.
सदर वाढदिवस अभिष्टचिंतनाचे औचित्य साधून दतकला शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष व प्रा. रामदास झोळ सर फाऊंडेशनचे डायरेक्टर श्री राणादादा सूर्यवंशी साहेब यांच्या संकल्पनेतुन प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसाची सुरुवात संस्थेच्या परिसरात विविध प्रकारच्या रोपट्यांचे वृक्षरोपण करुन साजरा करण्याचे ठरविलेले असल्याने सकाळी संस्थेच्या सर्व कर्मचाऱ्यांसमवेत प्रा. झोळ सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच वृक्षारोपण केलेल्या झाडांचे आपल्या मुलांसारखे संगोपन करण्याचे आवाहन श्री. राणादादा यांनी सर्वाना केले. तसेच प्रा. रामदास झोळ सर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रा. रामदास झोळ फॉउंडेशन ने पाच गरजू व होतकरू मुलींचा संपूर्ण शैक्षणिक खर्च करणार असल्याचे फाऊंडेशनचे डायरेक्टर श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब यांनी जाहीर केले.
श्री. राणादादा सूर्यवंशी आपल्या मनोगतात म्हणाले की, प्रा. रामदास झोळ सर यांनी आपल्या कार्यकर्तुत्वानें अखंड महाराष्ट्रासमोर शैक्षणिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. आजमितीस दतकला शिक्षण संस्थेमध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, व्यवस्थापनशास्त्र, ज्यु. कॉलेज या विभागांमध्ये ग्रामीण भागातील जवळपास ५००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
श्री. राणादादा सूर्यवंशी यांनी वाढदिवसानिमित संस्थेमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करून व संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करून प्रा. रामदास झोळ सर यांचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष श्री. राणादादा सूर्यवंशी साहेब, सचिव प्रा. माया झोळ मॅडम, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर तसेच संस्थेच्या सर्व विभागांचे संचालक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
