Uncategorized

पुणे शिक्षक मतदार संघातून मंगेश चिवटे यांची शिफारस करू -नामदार भरतशेठ गोगावले

करमाळा प्रतिनिधी
आरोग्य सेवेच्या माध्यमातून मंगेश चिवटे यांनी स्वतःचा ठसा संपूर्ण राज्यात उमटवला असून जी जबाबदारी दिली तो सक्षमपणे पार पाडण्याची जबाबदारी सक्षमपणे पार पाडतो
यामुळे आज प्रहार शिक्षक संघटनेसह विविध शिक्षक संघटनांनी पुणे शिक्षक मतदार संघातून मंगेश चिवटे उमेदवारीची मागणी केली आहे. या भागातील शिक्षकांच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पर्यंत पोहोचवूनमंगेशच्या उमेदवारीची शिफारस करू असे प्रतिपादन रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी आज करमाळ्यात केलेज्येष्ठ पत्रकार स्वातंत्र्य सैनिक नरसिंह मनोहर पंत चिवटे यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभात ते बोलत होते..यावेळी व्यासपीठावर असलेल्या माजी आमदार बच्चू कडू
राष्ट्रीय कीर्तनकार संग्राम बापू भंडारी,शिवसेना प्रवक्ते ज्योतीताई वाघमारे,माजी आमदार जयवंतराव जगताप,इतिहास संशोधक विश्वासराव पाटील,गोंदियाचे आमदार चंद्रिकापुरे,आधी सर्व नेत्यांनीच मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षक मतदार संघातून उमेदवारी द्यावी अशी मागणी भरत शेठ गोगावले यांच्याकडे केली.यावर बोलताना नामदार भरत शेठ गोगावले म्हणाले की मंगेश माझा धाकटा भाऊ असून त्याच्या उमेदवारीसाठी संपूर्ण ताकद लावून उमेदवारी मिळवून देऊ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पूर्ण ताकद देऊन मंगेशच्या कामाचं चीज करतील असा विश्वास नामदार भरत शेठ गोगावले यांनी व्यक्त केला.एकनाथ शिक्षक संघटनेचे कार्याध्यक्ष अडसूळ म्हणाले की सोलापूर जिल्ह्यात 11000 मतदार असून हे शंभर टक्के मतदान मंगेश यांना पडणार आहे
शिक्षक मतदार संघातील निवडणुकीचे मी प्रचार प्रमुख म्हणून काम केलेले आहेसातारा सांगली कोल्हापूर पुणे सोलापूर
या पाचही जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर शिक्षक लोक खुश आहेत.पुणे विभागातील 16 शिक्षक संघटनांनी मंगेश चिवटे यांना उमेदवारी द्यावी लेखी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.लवकरच सोलापूर येथे जिल्ह्यातील पाच हजार शिक्षकांचा मेळावा घेणार असून उपमुख्यमंत्री शिंदे यांना साकडे घालणार आहे शिक्षकांच्या सर्व मागण्या एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलेले आहेत.
त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो उमेदवार देतील तो प्रचंड मताधिक्याने या मतदार संघातून निवडून येणार आहे
यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंगेश चिवटे सारखा माणूस आमच्या शिक्षकांना विधान परिषदेसाठी उमेदवार म्हणून द्यावा अशी मागणी उपस्थित शिक्षकांच्या शिष्टमंडळांनी लेखी निवेदनाद्वारे केली

@@@@

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आज धर्म जिवंत राहत आहे यामुळे सर्व सांप्रदायिक समाज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे..सांप्रदायिक समाज व एकनाथ शिंदे यांच्या मध्ये समन्वय ठेवण्याचे काम मंगेश चिवटे करत आहेत
आरोग्य सेवा करताना कुठली जात धर्म पंत न पाहता चुटे यांनी सर्वसामान्य मदत केली आहे
अशा आरोग्य सेवकाला मतदान देण्याचे भाग्य शिक्षकांना द्यावयामुळे महाराष्ट्रातील वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भक्तांना सन्मानाचे स्थान राज्यात मिळत आहे
आरोग्य दूत म्हणून काम करणारा माणूस सर्वसामान्यांचा आवाज असलेला व्यक्ती म्हणून मंगेशला विधिमंडळात संधी द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने करतो
अशी भूमिका राष्ट्रीय कीर्तनकार संग्राम बापू भंडारी यांनी जाहीर सभेतून व्यक्त केली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!