Sunday, January 12, 2025
Latest:
Uncategorized

कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा आकर्षक स्टाॅल मंगेश बदर दिग्दर्शित मदार या चित्रपटाची फ्रान्समध्ये शानदार एंट्री

दाफचि,मुंबई : फ्रान्स येथे कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या बाजार विभागात महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचा आकर्षक स्टाॅल उभारण्यात आला आहे. या स्टाॅलला केंद्रीय माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरगन यांनी आज भेट दिली. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव श्री.विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.अविनाश ढाकणे यांनी त्यांचे स्वागत केले.

चित्रपटासंदर्भात महामंडळ राबवत असलेली योजना, महामंडळतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम अशी माहितीपूर्ण-आकर्षक डिझाईन केलेल्या स्टाॅलची यावेळी श्री. मुरगन यांनी पाहणी केली. तसेच महाराष्ट्र शासन चित्रपटाबाबत राबवत असलेल्या विविध योजना, उपक्रमांची माहितीही त्यांनी जाणून घेतली. त्याचबरोबर बाजार विभागासाठी पाठविण्यात आलेल्या चित्रपटांनां त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ चित्रपट समीक्षक श्री.अशोक राणे, महामंडळाचे वित्तीय सल्लागार वित्तधिकारी श्री.राजीव राठोड, चित्रपटांचे प्रतिनिधी उपस्थित होते

मराठी चित्रपटांनां आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे यासाठी महामंडळामार्फत २०१६ पासून या महोत्सवात सहभाग घेतला जात आहे. यंदा महोत्सवाच्या बाजार विभागासाठी संदीप सावंत दिग्दर्शित “या गोष्टीला नावच नाही”, सचिन मुल्लेमवार दिग्दर्शित “टेरिटेरी” आणि मंगेश बदर दिग्दर्शित “मदार” सिनेमांची निवड करण्यात आली. या तिन्ही चित्रपटांचे प्रतिनिधी कान येथे उपस्थित आहेत. निवडलेला चित्रपटांनां जागतिक बाजारपेठ मिळावी, चित्रपटांचे वितरण व्हावे यासाठी ते प्रयत्न करणार आहेत.
———————————
*परिसंवादामध्ये सहभाग*

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने आयोजित केलेल्या India: The Complete Filming Destination या विषयावरील परिसंवादात सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव श्री.विकास खारगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अविनाश ढाकणे यांनी सहभाग घेतला.
———————————-
*डॉ. जब्बार पटेल यांनी दिली भेट*

सिंहासन, डॉ. बाबसाहेब आंबेडकर सारख्या अजरामर चित्रपटांचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी महामंडळाच्या स्टाॅलला भेट देऊन कौतुक केले. आज दिवसभर देश-विदेशातील चित्रपट समीक्षक, निर्माते, दिग्दर्शक, सिनेपत्रकार, कलाकार,चित्रपट रसिक आदि मंडळी स्टाॅलला भेट दिली.
……..

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group