श्री आदिनाथ साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अथवा व्हाईस चेअरमनपदी जेष्ठ संचालक डॉ. हरिदास केवारे यांची निवड करण्याची मागणी
करमाळा प्रतिनिधी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सोसायटी मतदारसंघातून डॉक्टर हरिदास केवारे यांची सहाव्या वेळी बहुमताने संचालकपदी निवड झाली आहे.
त्यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अथवा व्हाईस चेअरमनपदी त्यांची निवड करून त्यांच्या ज्येष्ठतेचा कार्याचा गौरव करावा अशी मागणी ऊस उत्पादक सभासदांमधून होत आहे. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये आमदार नारायण आबा पाटील यांच्या संजीवनी पॅनल मधून डॉक्टर हरिदास केवारे सर्वात प्रथम निवडून आलेले उमेदवार असून त्यांना आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा कामाचा मोठा प्रदीर्घ अनुभव असून त्याचा फायदा आदिनाथ कारखाना चालू करण्यासाठी होऊ शकतो. ज्येष्ठतेनुसार चेअरमन अथवा व्हाईस चेअरमनपदाची जबाबदारी पार पाडण्यासाठी सक्षम अनुभवी असल्याने प्रबळ दावेदार आहेत .त्यामुळे सध्या बंद अवस्थेत असलेला आदिनाथ कारखाना पूर्ण क्षमतेने चालू करून यशस्वी गाळप करण्यासाठी सहाव्यांदा निवडून आलेल्या जेष्ठ संचालक डॉक्टर हरिदास केवारे यांची चेअरमन पदी अथवा व्हाईस चेअरमन पदी निवड करावी अशी मागणी शेतकरी सभासदांनी केली आहे.


