Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळा

जीवनात योग्य दिशेने यशस्वीपणे वाटचाल करण्यासाठी घुमरे सरांसारख्या दिपस्तंभाची गरज -पंढरीनाथ साटपे

करमाळा प्रतिनिधी दुसऱ्याचे जीवन समृद्ध करण्यासाठी धडपडणारे व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव घुमरे सर प्रतिकुल परिस्थितीवर मात करून शुन्यातून विश्र्व निर्माण करून यशस्वी जीवन कसे जगावे यांचे उत्तम उदाहरण असुन युवापिढीने त्यांचा आदर्श घेऊन जीवनात यशस्वीपणे वाटचाल करावी असे मत बदलापुरचे उद्योजक पंढरीनाथ साटपे यांनी व्यक्त केले. विद्या विकास मंडळांचे सचिव विलासरावजी घुमरे सर यांच्या ६‍७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने यशवंत परिवाराच्या वतीने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात यशवंत परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. वाढदिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावियालयांचे प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील हे होते. या शिबीरांचे उद्घघाटन डॉ.रोहन पाटील, कारखान्याचे माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर उद्योजक आशुतोष घुमरे यांच्या हस्ते संपन्न झाले . यावेळी महाविद्यालयातील एन सी सी, एन एस एस च्या विद्यार्थ्यानी व यशवंत परिवारातील ७० सदस्यानी रक्तदान केले . या कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा.प्रदिप मोहिते यांनी केले . त्यानंतर सकाळी १० वाजता महाविद्यालयांच्या पाठीमागील मैदानावर वृक्षारोपण करण्यात आले.या कार्यक्रमाला आदिनाथ कारखान्याचे माजी चेअरमन तात्यासाहेब मस्कर,प्रकाश बागडे ॲड विक्रांत घुमरे, प्रंबधक कैलास देशमुख, विलासराव घुमरे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश पाटोळे, सचिव राजेंद्र साळुंखे .दिगंबरराव बागल पेट्रोलियम युनिसोर्सचे सर्व कर्मचारी व यशवंत परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते. यानंतर यशवंत परिवाराच्या वतीने विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त विलासराव घुमरे सर व जयश्रीताई घुमरे यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. यानंतर विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ठचिंतन विजयश्री सभागृहात करण्यात आले.या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी बदलापुरचे उद्योजक पंढरीनाथ साटपे, गुलाबराव बागल सर, डॉ.भोसले, आदिनाथ कारखान्याचे संचालक प्रकाश झिंजाडे, विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड सर, सहसचिव विक्रमसिंह सुर्यवंशी, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजीराजे किर्दाक सर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी राजेंद्र पवारसाहेब ॲड विक्रांत घुमरे,चि.राणा घुमरे होते. या कार्यक्रमांचे प्रास्ताविक प्रा. प्रदिप मोहिते यांनी केले.तर सुत्रसंचालन प्रा.विष्णू शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये महाविद्यालयातील सरांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधाचा आढावा घेतला .प्राचार्य डॉ.एल.बी. पाटील यांनी अनेक व्यक्तीच्या जडणघडणीत घुमरे सराचा सिंहाचा वाटा जाणवल्याचे स्पष्ट केले. आपल्या मनोगतामध्ये विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड सरांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विलासराव घुमरे सर म्हणजे अनेकजनांच्या जीवन समृद्ध करणारे व्यक्तिमत्त्व असल्याचे सांगितले. तुम्ही तुमच्या जीवनात घुमरेसरासारख्या गुरुरुपी मार्गदर्शकाची गरज असुन घुमरे सरांसारखे खरे मार्गदर्शक तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतील असे सांगितले . सतत संघर्ष करणारे व सतत दुसऱ्यांना मदत करणारे असे घुमरे सर आहेत. संकटांशी दोन हात करून सर्वांचे भले करण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये असल्याने जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात शैक्षणिक क्षेत्रात सरांनी आपले अढळ स्थान निर्माण केले असून सरांच्या मार्गदर्शनाखाली यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे नाव सोलापूरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात झाले आहे याची जाणीव ठेवून सर्वांनी आपले काम प्रामाणिकपणे करणे आवश्यक असल्याचे सांगितले. सरांचा सहवास लाभलेल्या माणसाच्या जीवनाचे सोने झाले असल्याचे मनोगतातून सांगितले. यावेळी प्रा.प्रदिप मोहिते,प्रा.सुजाता भोरे यांनी सरांच्या जीवनकार्याविषयी मनोगत व्यक्त करुन विलासराव घुमरे सर यांचा आदर्श घेण्याची गरज असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाचे आभार प्रा. अनिल साळुंखे सर यांनी मानले .

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group