Uncategorized

डिजिटल मिडिया पत्रकार संपादक संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांना दुबईत “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान

*
करमाळा प्रतिनिधी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री. राजा माने यांना त्यांच्या पत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल आणि डिजीटल मिडियामधील कार्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दैनिक दामाजी एक्सप्रेसच्या १६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभात देण्यात येणार आहे.
वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक दिगंबर भगरे यांनी सांगितले की, हा कार्यक्रम दुबई येथे शनिवार, ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पार पडणार असून, मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण केले जाणार आहे. पत्रकारितेत केलेल्या कार्याची दखल घेऊन आणि डिजीटल मिडियामधील उत्कृष्ट कामगिरीसाठी राजा माने यांना “पत्रकाररत्न” आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.
राजा माने हे बार्शी येथील पत्रकारितेत एक ओळखलेले नाव असून, त्यांनी अनेक वर्षांपासून वृत्तपत्र माध्यमातून समाजातील महत्त्वाच्या घडामोडींवर लेखन केले आहे. तसेच डिजीटल माध्यमाचा उपयोग करून जनजागृतीसाठी कार्य केले असून, त्यांच्या कार्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळणे हा त्यांच्या जीवनातील अत्यंत आनंदाचा क्षण आहे.
दिगंबर भगरे म्हणाले, “राजा माने यांनी डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना स्थापन करून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात डिजिटल मीडियाला आणि त्यामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी कार्य केले असून, डिजिटल मीडिया क्षेत्रातील पत्रकारांना राजकीय व प्रशासकीय मान्यता मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. तसेच त्यांनी शासनाकडे डिजिटल जाहिरात धोरण निश्चित करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. पत्रकारांच्या कुटुंब कल्याणासाठी प्रतिबिंब प्रतिष्ठानची स्थापना करून अनेक पत्रकारांना मदत केली आहे. डिजिटल मीडिया पत्रकारांसाठी वैद्यकीय उपचार व दहा लाखांचा विमा व पेन्शन योजना लागू करण्यासाठी देखील त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. पत्रकारितेत प्रामाणिक आणि समाजोपयोगी काम केले आहे. त्यांच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सन्मान होणे हे केवळ त्यांच्यासाठीच नाही तर महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांसाठी अभिमानाची बाब आहे. या कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अनिवार्य आहे, ज्यायोगे ते पुरस्कार स्वीकारून इतर पत्रकारांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतील.”
सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमात जगभरातील निवडक गुणवंतांचा सन्मान केला जाणार असून, यामुळे पत्रकारितेतील प्रामाणिक आणि समर्पित कामगिरीला जागतिक मान्यता मिळेल असे मत व्यक्त केले आहे

error: Don\'t try to copy. Content is protected !!