Friday, September 18, 2026
Latest:
Uncategorized

यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली


करमाळा प्रतिनिधी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील, कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचे ‌सेवानिवृत्त आदर्श गणित शिक्षक स्व. अर्जुन तात्या फंड सर यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने फंड परिवारासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
स्व. फंड सर हे साधेपणा, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी यांसाठी ओळखले जात होते. शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. त्यांच्या विचारांचा व संस्कारांचा ठसा असंख्य विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या जीवनावर उमटला आहे. त्यांच्या जाण्याने समाजातील एक ज्येष्ठ व आदरणीय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
या दुःखद प्रसंगी यशवंत परिवाराच्या वतीने स्व. अर्जुन तात्या फंड सर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी फंड कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन व्यक्त केले. तसेच यशवंतराव महाविद्यालयाच्या वतीनेही त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची प्राचार्य डॉक्टर अभिमन्यू माने उपप्राचार्य डॉक्टर अनिल साळुंखे प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक सर प्राध्यापक रााख जाधव सर  यशवंत परिवारातील सदस्य, शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी दोन मिनिटे मौन पाळून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, अशी प्रार्थना करण्यात आली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!