Friday, August 21, 2026
Latest:
निधन वार्ता

विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांना पितृशोक; अर्जुन तात्या फंड सर यांचे दुःखद निधन


करमाळा प्रतिनिधी: विद्या विकास मंडळचे अध्यक्ष तथा यशवंतराव चव्हाण महाविद्यालयांशी संबंधित नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य मिलिंद फंड यांचे वडील कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे गणित विषयाचे सेवानिवृत्त शिक्षक  स्व. अर्जुन (तात्या) ज्योतीराम फंड सर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच करमाळा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
स्व. अर्जुन तात्या फंड सर हे अत्यंत मनमिळाऊ, प्रेमळ व साध्या स्वभावाचे होते. ‘तात्या’ या नावाने ते परिसरात सर्वपरिचित होते. विद्यार्थ्यांचे आवडते सर म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आयुष्यभर साधेपणा, कष्ट आणि मूल्यांवर आधारित जीवन जगले.
अत्यंत खडतर परिस्थितीतून त्यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. कष्टाच्या जोरावर पाचही मुलांना उत्तम शिक्षण देऊन त्यांना सक्षम घडविले. त्यांच्या संस्कारांचा ठसा कुटुंबियांच्या यशात दिसून येतो. दोन मुलांचे अकाली निधन झाले तरी त्यांनी त्या दुःखावर खंबीरपणे मात करून कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.त्यांचावर शुक्रवार, दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी , विकासनगर १२ बंगल्याच्या पाठीमागे हिंदू स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या अंत्यसंस्काराला शैक्षणिक सामाजिक राजकीय विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

error: Don\'t try to copy. Content is protected !!