करमाळा शहरातील रेशन दुकानदार दत्त पेठ येथील रहिवासी आजिनाथ चिंचकर यांचे दुखःद निधन
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील रेशन दुकानदार दत्त पेठ येथील रहिवासी आजिनाथ मुरलीधर चिंचकर यांचे दुखःद निधन झाले.त्यांच्या मृत्यूपश्चात 3 मुले 2 सुना व नातवंडे असा परिवार आहे.करमाळा येथील हिंदु स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या अंत्य संस्काराला सर्व क्षेत्रातील मान्यवर नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते रेशन दुकानदार सचिन चिंचकर यांचे वडील होते. मनमिळावू प्रेमळ स्वभावाचे म्हणून परिचित होते.त्यांच्या आकस्मिक निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
