करमाळ्याची कुलस्वामीनी आई कमला भवानी यात्रा दि.७.११.२०२२ पासुन प्रारंभ दि.११.११.२०२२ पर्यंत या कालावधीमध्ये यात्रा संप्पन होणार
करमाळा प्रतिनिधी करमाळ्याची कुलस्वामीनी आई कमला भवानी यात्रेस दि.७.११.२०२२ पासुन प्रांरभ होणार असुन दि.११.११.२०२२ या पाच दिवसाच्या कालावधीमध्ये कोरोनाकाळानंतर मोठया उत्साहात आनंदात पार पडणार आहे.
यात्रेच्या काळात आई कमला भवानीचा रोज दुपारी 4 व रात्री 9 छबीना निघतो गरुड, सिंह, नंदी, मोठा नंदी, काळवीट, ऐक मुखी घोडा, मोर, लहान हत्ती, सप्तमुखी घोडा, व मुख्य यात्रेचा दिवशी मोठ्या हत्ती वर देवीचा छबीना निघतो आई कमला भवानी गजारूढ होऊन खंडोबाच्या भेटीस निघते महाराष्ट्रातुन भाविक येतात श्री.कमला भवानी मंदिर पुजारी ओंकार पुजारी विजय कमलाकर सोरटे महेश कवादे व सेवेदारी हनुमंत पवार हे आपली सेवा नित्य पार पाडतात.
