पवार जनरल हॉस्पिटलचे डॉ रविकिरण पवार यांच्यातर्फे रुग्णसेवेची बारा वर्षाची परंपरा जपत वर्षातील दुसरे मोफत संधिवात शिबीर संपन्न
करंजे प्रतिनिधी करंजे येथे पवार जनरल हॉस्पिटल चे डॉ रविकिरण पवार यंच्यातर्फे बारा वर्षाची परंपरा जपत वर्षातील दुसरे मोफत संधिवात शिबीर संपन्न झाले.
हरिनाम सप्ताहातील काल्याच्या कीर्तनादिवशी वर्षातील दुसरे शिबीर संपन्न संधिवाताच्या रुग्णासाठीचेमोफत तपासणी व मोफत उपचार शिबिराची बारा वर्षांपासून परंपरा .वयोवृद्ध गरजू करमाळ्याला येऊ न शकणाऱ्या महिला रुग्णांसाठी उपयुक्त. 110 रुग्णांची तपासणी व मोफत उपचार .सर्व तयारी डॉ रविकिरण ज्ञानदेव पवार यांनी केली . डॉ प्राजक्ता बाबासाहेब पाटील यांनी महिला रुग्णांची तपासणी व उपचार करून मदत केली . बोरगावच्या वैभव गायकवाड व शेलगाव येथील सचिन पाटील यांनी काही औषधांची उपलब्धता केली .
यामध्ये पवार जनरल हॉस्पिटलच्या अक्षय ओहोळ ,सनी गुणवरे, अमोल शिंदे , रेश्मा शेख इत्यादी स्टाफ ने सहकार्य केले .
शिबीर आयोजनासाठी चंद्रशेखर सरडे , अण्णासाहेब साबळे , बाबासाहेब पाटील सर , उमेश सरडे , प्रवीण पवार , राजेंद्र पवार व इतर सर्व ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले .आपल्या जन्मभूमीचे समाजाचे आपण देणे लागतो या भावनेतून हे शिबीर दरवर्षी आयोजित करतो असे मनोगत डॉ पवार यांनी व्यक्त केले .
