करमाळासहकारसाखरउद्योग

श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 21 पैकी 21 जागा जिंकून आमदार नारायण पाटील यांच्या संजीवनी पॅनलचा दणदणीत विजय पाटील गटाने मिळवली एक हाती सत्ता


करमाळा प्रतिनिधी: संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील आदिनाथ सह,साखर कारखाना संजीवनी पॅनल चे 21 पैकी सर्व 21 उमेदवार विजयी झाले असून या निवडणुकीत माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनल चा पराभव झाला आहे. स्वतः संजयमामा शिंदे यांचा केम ऊस उत्पादक गटातून पराभव झाला आहे.तर विद्यमान आमदार नारायण पाटील भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग गटातून विजयी झाले आहेत.
श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 21 संचालक मंडळाच्या जागेसाठी 62 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात सकाळी 8 वा. मतमोजणी सुरु करण्यात आली. सुरुवातीस संस्था प्रतिनिधी गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर पाच ऊस उत्पादक गटातील मतांची मोजणी करण्यात आली त्यानंतर महिला प्रतिनिधी सह सर्व राखीव गटातील मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.                निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार सौ शिल्पाताई ठोकडे व सर्व सहकारी                सहकारी संस्था प्रतिनिधी गट
आ.नारायण पाटील गटाचे
डॉ. हरीदास केवारे 218 (विजयी)
संजयमामा शिंदे गटाचे
सुजित बागल 117
प्रा.रामदास झोळ गटाचे
दशरथ कांबळे. 05 मते मिळाली आहेत. या गटातून डॉ. केवारे 99 मतांनी विजयी झालेले आहेत.

जेऊर ऊस उत्पादक गटातून
आमदार नारायण पाटील गटाचे
श्रीमान चौधरी 8061(विजयी), महादेव पोरे 8195 (विजयी) दत्तात्रय गव्हाणे 8607(विजयी)
माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे
चंद्रकांत सरडे 6846, प्रशांत पाटील 6897, प्रमोद बदे 6811 मते मिळाली आहेत.
प्रा रामदास झोळ गटाचे
रवींद्र गोडगे 820, शांतीलाल जाधव 848, दत्तात्रय कामटे 859 मते मिळाली आहेत.
सालसे ऊस उत्पादक गटातून
आमदार नारायण पाटील गटाचे
रविकिरण फुके 8232 (विजयी), दशरथ हजारे 7933(विजयी) आबासाहेब अंबारे 8479(विजयी)
संजय मामा शिंदे गटाचे
विलास जगदाळे 6805, नागनाथ चिवटे 7039, नवनाथ जगदाळे 6805.
रामदास झोळ गट
अण्णासाहेब देवकर 858, दत्तात्रय जगदाळे 882, भारत सरडे 813.

पोमलवाडी ऊस उत्पादक गट
आमदार नारायण पाटील गट
किरण कवडे 8571(विजयी), नवनाथ झोळ 8343(विजयी), संतोष पाटील 8328 (विजयी)
संजय मामा शिंदे गट
दशरथ पाटील 6701, बबन जाधव 68 37,नितीन राजे भोसले 6708,
रामदास झोळ
रामदास झोळ 1137, भरत जगताप 766, प्रकाश गिरंजे 765.

केम ऊस उत्पादक गट
आमदार नारायण पाटील गट
दत्तात्रय देशमुख 8625(विजयी) विजयसिंह नवले 8106(विजयी) महेंद्र पाटील 8337 (विजयी)
संजय मामा शिंदे गट
संजयमामा शिंदे 7060, सोमनाथ देशमुख 6728 सोमनाथ रोकडे 6779
प्रा.रामदास झोळ गट
सुधीर साळुंखे 824 बापूराव तळेकर 997.
रावगाव ऊस उत्पादक गट
आमदार नारायण पाटील गट
डॉ अमोल घाडगे 8575(विजयी), देवानंद बागल 8092(विजयी) अँड राहुल सावंत 8036(विजयी)
संजय मामा शिंदे गट
आशिष गायकवाड 6048, अभिजीत जाधव पाटील 7053, विनय ननवरे 6654.
प्रा.रामदास झोळ गट
कल्याण पाटील 997
हरिभाऊ झिंजाडे 911
सुभाष शिंदे 784.

महिला राखीव गट..
आमदार नारायण पाटील गट
राधिका तळेकर 8537(विजयी),उर्मिला सरडे 8383 (विजयी)
संजय मामा शिंदे गट…
मंदा सरडे 6874 शालन गुंडगिरे 7073.
प्रा.रामदास झोळ गट..
इंदुबाई नाईकनवरे 794
रत्नमाला मंगवडे 762.

इतर मागासवर्गीय गट..
आमदार नारायण पाटील गटाचे
दादासाहेब पाटील 9129 (विजयी) संजय मामा शिंदे गटाचे रोहिदास माळी 7146 व प्रा. रामदास झोळ गटाचे रवींद्र गोडगे 950.

अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गट..
आमदार नारायण पाटील गटाचे राजेंद्र कदम 8806 (विजय) संजय मामा शिंदे गटाचे बाळकृष्ण सोनवणे 7226 रामदास झोळ गटाचे दशरथ कांबळे 1094.

विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी गटाचे आमदार नारायण पाटील 9462 (विजयी )संजय मामा शिंदे गटाचे अनिल केकान 6819 रामदास झोळ गटाचे रायचंद खाडे 871.
या निवडणुकीत प्रा. रामदास झोळ या तिसऱ्या पॅनलच्या उमेदवारांना दीड हजाराच्या वरही मतदान मिळवता आलेले नाही.
नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनलचा दारून पराभव केल्यानंतर आमदार पाटील गटाच्या समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.

ऊस उत्पादक सभासदांनी आमच्यावर विश्वास ठेवून कारखाना ताब्यात दिल्यानेआदिनाथ सहकारी साखर कारखान्याला गत वैभव प्राप्त करून देणार.
नारायण पाटील, आमदार करमाळा

error: Don\'t try to copy. Content is protected !!