सामाजिक बांधिलकीच्या भावनेतुन वारकऱ्यांसाठी करमाळयातील डाॅक्टरांची मोफत वैद्यकीय सेवा
करमाळा प्रतिनिधी
करमाळा शहरात येणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी 2 व 3 जुलै रोजी मौलाली माळ बायपास रोड लुणिया डेव्हलपर्स बिल्डिंग येथे करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर असोसिएशन (KTMPव केमिस्ट व ड्रगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी व उपचार शिबीर चालू असून आत्तापर्यंत 400 वारकऱ्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले.शिबिरासाठी डॉ हर्षवर्धन माळवदकर, डॉ विनोद गदिया डॉ सुहास कुलकर्णी, डॉ बाबुराव लावंड, डॉ अनुप खोसे, डॉ महेशचंद्र वीर, डॉ अविनाश घोलप ,डॉ पोपट नेटके डॉ विशाल शेटे, तुषार गायकवाड, डॉ रविकिरण पवार ,डॉ राम बिनवडे डॉ राजेश मेहता डॉ कापले डॉ मनोज काळे डॉ अशोक शिंदे डॉ उमेश जाधव डॉ. बिपीन परदेशी, डॉ प्रमोद शिंदे व डॉ समीर बागवान हे सर्व डॉक्टर्स आपला बहुमूल्य वेळ देऊन वारकऱ्यांचे उपचार करून सेवा देत आहेत .केमिस्ट असोसिएशनचे विवेक ननवरे संतोष घोलप ,पिंटू पाटणे ,बरिदे हे उत्तम प्रकारे औषंधाचें नियोजन करत आहेत ज्यांच्याकडे दिंडी असतील त्यांनी या शिबिराची माहिती जास्तीत जास्त वारकऱ्यांनी द्यावी व जास्तीत जास्त वारकर्यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ असोसिएशन व केमिस्ट असोसिएशन कडून करण्यात येत आहे.
