देवळालीत वारकऱ्यासाठी वैद्यकीय मोफत सेवेचा स्तुत्य उपक्रम: पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे
करमाळा प्रतिनिधी परमार्थातून सेवा आणि सेवेतून मिळणारा आनंद गगनात मावत नाही असे उद्गार देवळाली मध्ये मोफत सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ करताना पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी सांगितले
देवळाली ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पुढे बोलताना करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सूर्यकांत कोकणे म्हणाले की पंढरपूरला आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी वारीमध्ये चालत जात असताना बऱ्याच लोकांना शारीरिक त्रास सहन करावा लागतो त्यावेळी त्यांना सहजासहजी रस्त्यावर दवाखाने उपलब्ध होत नाहीत परंतु दमून भागून आलेल्या वारकऱ्यांना देवळाली गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने जो वैद्यकीय मोफत सेवेचा उपक्रम हाती घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य असून यापुढेही वारकऱ्यांची सेवा अशीच व्हावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली
याप्रसंगी देवळाली गावचे सरपंच आशिष गायकवाड उपसरपंच धनंजय शिंदे डॉ बारगोजे ग्रामसेवक नागरगोजे सर्व शिक्षक आंगनवाड़ी सेविका, मदतनीस, आशाताई आणि गावातील स्वयंसेवक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
