करमाळा भाजपाच्यावतीने शहीददिन साजरा
करमाळा प्रतिनिधी क्रांतिवीर भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना 23 मार्च 1931 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जिवाची बाजी लावणाऱ्यांना ब्रिटीश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस ‘शहीद दिवस’ म्हणून साजरा केला जातो असे मत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले ते भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने किल्ला वेस येथे स्मृती दिनानिमित्त बोलत होते यावेळी प्रतिमेचे पूजन राधेश्याम देवी श्याम सिंधी , महेश परदेशी यांच्या हस्ते करण्यात आले पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की ब्रिटीश सायमन कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला. यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. शेवटी त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले होते. या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली. 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली. फाशीच्या वेळी तिघांनी ‘मेरा रंग दे बसंती चोला, हे गाणे गायले होते.देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी अशा हजारो हजारो क्रांतिकारकांनी आपले बलिदान दिले आहे.भाजपा तालुका सरचिटणीस अमरजीत साळुंके शहर अध्यक्ष जगदीश आगरवाल ,संजय गांधी निराधार समितीचे नरेंद्रसिंह ठाकुर ,भगवान गिरी ,प्रदीप देवी ,सुजित दोशी, मयूर देवी, सचिन चव्हाण, सचिन पांढरे ,श्यामसिंधी ,सागर दळवी दीपक पडवळे चेतन ढाळे अमोल महाडिक प्रेमकुमार परदेशी रवी कुलकर्णी आदीजण उपस्थित होते.
