Tuesday, April 22, 2025
Latest:
करमाळासकारात्मक

करमाळ्यात दिव्यांगांसाठीच्या कृत्रिम अवयव मोजमाप शिबीर संपन्न*

 

करमाळा प्रतिनिधी क्रिऄटिंग होपस् कॅनडा ,सक्षम करमाळा आणि भारत विकास परिषद करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग साठी करमाळा शहरामध्ये कृत्रिम (जयपूर फुटस)पाय ,हात आणि कॉलिपर्स देण्यासाठी मोजमाप शिबीर श्री दत्त मंदिर विकास नगर येथे संपन्न झाले.    या शिबीरामध्ये एकुण 115 जणांची तपासणी करून तपासणी अंती 85 जणांना कृत्रिम अवयवाची आवश्यकता असल्याचे निदान झाले. तसेच त्यांना कृत्रिम अवयव देण्याचे ठरले आहे. लवकरच त्यांना कृत्रिम अवयव बसवण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाचे उद्घघाटन विनय खटावकर(पुणे), अनिरुद्ध पाटणकर(पुणे), वासुदेव कालरा(पुणे), महेश टंकसाळे(पुणे), गहिनीनाथ नलावडे (पुणे), अनिरुद्ध पाटील(बार्शी), सुहास देशमुख(बार्शी), अनंत कवठाळे(बार्शी), गणेश करे पाटील, श्रेणिक खाटेर, सचिन साखरे, मुकुंद राजोपाध्ये, डॉ श्रीराम परदेशी यांच्या उपस्थितीत पार पडले.        याप्रसंगी दिपक चव्हाण (सिनेट सदस्य सोलापूर विद्यापीठ ) , मिथिल राजोपाध्ये, नरेंद्रसिंह ठाकूर(संजय गांधी निराधार सदस्य) , अमरजित साळुंखे(सचिव सर्वोदय प्रतिष्ठान) , बाळकृष्ण कुलकर्णी, सचिन चव्हाण, मनोज कुलकर्णी, संजय कुलकर्णी, चैतन्य पाटील, निलेश जोशी, प्रेम परदेशी, महेश राजोपाध्ये, महेश शहाणे, सुनील पाटील, सुशांत कुलकर्णी, पत्रकार विशाल घोलप, सचिन दुधे, दिलीप शिरगिरे, दत्ता कांबळे, सागर दळवी, विनायक दाभाडे सुरज मिसाळ उपस्थित होते.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group