करमाळा

सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जाब विचारला तर ३५३ खाली गुन्हा दाखल गुन्हा दाखल करण्याची धमकी ? : असल्या धमक्यांना भीक घालत नाही- विवेक येवले

करमाळा(प्रतिनिधी)- सर्वसामान्य जनतेची शासन दरबारी विविध कामांसाठी होणारी परवड,पिळवणूक याविरुद्ध मी सातत्याने आवाज उठवत आलोय,ज्या-त्या
अधिकारी,कर्मचाऱ्यांना जेव्हा गरज असेल त्या-त्या वेळी
सभ्य,सुसंस्कृत भाषेत विचारणा करत गोरगरिबांची कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न गेली ४५ वर्षे पत्रकारिता, राजकारण, समाजकारणाच्या माध्यमातून करत आलो आहे.मात्र भूमी अभिलेख/सिटी सर्व्हे कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडून मला हस्ते-परहस्ते माझ्याविरुद्ध ३५३ चा गुन्हा दाखल करण्याची धमकी मिळाल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार,मकाईचे माजी संचालक,संजयमामा समर्थक विवेक येवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
मी माझ्याकडे येणाऱ्या,संपर्क साधणाऱ्या सामान्यांच्या तक्रारीचे निवारण होण्यासाठी ज्या-त्या कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून नेहमीच प्रयत्न करत असतो आणि मी नेहमीच शासकीय यंत्रणेतील संबंधितांना हेही सांगत असतो,अरे…तुम्ही कामे वेळेवर केली तर सामान्य लोकं तुम्हाला न मागता खुशीने पैसे देतात,पण प्रशासन इतकं निर्लल्ज,गेंड्याच्या कातडीचे झालंय की पैसे खाऊनसुद्धा
सामान्य जनतेला वेठीस धरून त्यांची छळवणूक करणे
ही अपवाद वगळता प्रशासनाची मानसिकता बनलेली आहे.आजमितीला सर्वात तक्रारी भूमी अभिलेख/सिटी सर्व्हे कार्यालयाविषयी असल्याने मी गेल्या काही दिवसांपासून दर मंगळवारी तिथं उपस्थित राहून नडलेल्या व हेतुपुरस्सर या कार्यालयाकडून गांजविल्या, वेठीला धरल्या जाणाऱ्या सामान्य जनतेची कामे मार्गीलावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असताना जर मलाअशी धमकी दिली जात असेल तर धमकी देणाऱ्यानी हेही लक्षात ठेवावं, स्वातंत्र्यपूर्व काळात पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार,स्वातंत्र्यसैनिक शंकरराव येवलेदादा यांचा मी वारस आहे असा इशारा यावेळी बोलताना येवले यांनी दिला आहे.

error: Don\'t try to copy. Content is protected !!
WhatsApp Group